Join us

IPL 2025 Restart : कधी पासून अन् कुठं खेळवण्यात येणार उर्वरित सामने? BCCI चा नवा प्लॅन ठरलाय, पण...

IPL स्पर्धेतील उर्वरित सामने कधीपासून अन् कोणत्या ठिकाणी खेळवण्यात येणार त्यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:44 IST

Open in App

When Will IPL 2025 Restart : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्थगित आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्याचा प्लॅन ठरवला आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांना रविवारी म्हणजेच ११ मे २०२५ रोजी रात्री नव्या वेळापत्रका संदर्भात कळवण्यात येईल. भारत आणि पाकिस्तान युद्धविराम घोषित झाल्यावर आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ही स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारच्या परवानगीससह अन्य आवश्यक बाबींची प्रक्रिया पूर्ण करण्याची सर्व तयारी झाल्याचे दिसते. IPL स्पर्धेतील उर्वरित सामने कधीपासून अन् कोणत्या ठिकाणी खेळवण्यात येणार त्यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!कधीपासून अन् कुठं खेळवण्यात येणार उर्वरित सामने? 

 इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, "आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने १६ ते ३० मे या कालावधीत खेळवण्याची योजना बीसीसीआयने आखली आहे. चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या ठिकाणी हे खेळवण्याचा विचारही सुरु आहे. स्पर्धेतील १० फ्रँचायझी संघांना रविवारी रात्रीपर्यंत नवे शेड्यूल देण्यात येणार असल्याचा उल्लेखही वृत्तामध्ये  करण्यात आलाय. साखळी फेरीतील उर्वरित १२ सामन्यांसह प्लेऑफ्समधील लढतीसाठी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी बीसीसीआयला किमान २ आठवड्यांचा कालावधी लागेल. यातील प्लेऑफ्स आणि फायनलसाठीच ६ दिवस लागतील. त्यामुळे स्पर्धा ३० पर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकते.  

गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर 

BCCI ठरलेल्या वेळेत फायनल खेळवण्यासाठी प्रयत्नशील, पण... 

याआधी डबल हेडरच्या प्लॅनसह बीसीसीआय साखळी फेरीतील सामने लवकर आटोपून फायनल ठरलेल्या वेळेत खेळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात होते. पण स्पर्धेतील लढती पुन्हा सुरु करण्यासाठी १६ मे ही तारीख निश्चित झाल्यामुळे आधी ठरलेल्या वेळेनुसार २५ मे रोजी ही स्पर्धा संपवणे मुश्किलच आहे.  त्यामुळेच आता आयपीएल स्पर्धा ३० मे पर्यंत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  हा प्लॅन ठरला असला तरी बीसीसीआयने अधिकृतरित्या यासंदर्भात पुष्टी केलेली नाही. त्यामुळे कोणता सामना कधी अन् कोणत्या मैदानावर खेळवण्यात येणार ते वेळापत्रक समोर आल्यावरच स्पष्ट होईल.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५बीसीसीआयइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट