Mi Cape Town vs Sunrisers Eastern Cape, Final SA20, 2025 : आयपीएलच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत सुरु झालेली एसए२० लीग स्पर्धेतील तिसरा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होत असली तरी फायनल लढतीतील दोन संघाचे भारताशी थेट कनेक्शन आहे. दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधील तिसऱ्या हंगामातील जेतेपदासाठी आयपीएलमधील दोन मालकांचे संघ एकमेकांना भिडणार आहेत. यातील एक संघ आहे तो अंबानींच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स या फ्रेंचायझीचा अन् दुसरा संघ आहे तो काव्या मारनच्या मालकीचा आहे. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेतील लीगमधील दोन संघात रंगणाऱ्या फायनलमध्ये काव्या मारन वर्सेस नीता अंबानी असं एक ट्विस्टही पाहायला मिळेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या लीगमध्ये काव्या मारनच्या संघाचा दबदबा, MI फ्रँचायझी पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत
दक्षिण आफ्रिकेतील लीगच्या तिसऱ्या हंगामातील फायनल लढत ही मुंबई इंडियन् केपटाउन विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न केप हे दोन संघ जेतेपदासाठी एकमेकांसमोर असतील. नीता अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स केपटाउन संघाने पहिल्यांदा या स्पर्धेत फायनल गाठली आहे. दुसरीकडे या लीग काव्या मारनच्या संघाचा जलवा पाहायला मिळाला आहे. या संघाने पहिल्या दोन हंगामात बाजी मारली असून यंदाच्या जेतेपदासह ते हॅटट्रिकचा डाव साधण्यासाठी मैदानात उतरतील. दुसरीके MI फ्रँचायझी संघ त्यांची हॅटट्रिक रोखत पहिले जेतेपद उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतील.
कधी अन् कुठं रंगणार सामना?
दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधील तिसऱ्या हंगामातील फायनल लढत शनिवारी ८ जानेवारीला रंगणार आहे. जोहन्सबर्गच्या द वंडर्स स्टेडियमवर रंगणारा सामना रात्री ९ वाजता सुरु होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कशिवाय डिज्नी हॉटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल. MI केप टाउन संघ
ख्रिस बेंजामिन, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, डेवाल्ड ब्रेविस, कॉनर एस्टरह्युझेन, रीझा हेंड्रिक्स, कॉलिन इंग्राम, थॉमस काबेर, रशीद खान (कर्णधार), जॉर्ज लिंडे, ट्रिस्टन लुस, अझमातुल्ला ओमरझाई, डेन पिएड, डेलानो पोटगीटर, नुवान थिराबा, आरओ, नुवान, आर. रस्सी व्हॅन डर डुसेन, सेदिकुल्ला अटल, मॅथ्यू पॉट्स.
सनरायझर्स इस्टर्न केप संघ
टॉम एबेल, ओकुहले सेले, डेव्हिड बेडिंगहॅम, ओटनील बार्टमन, झॅक क्रॉउली, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, सायमन हार्मर, जॉर्डन हर्मन, मार्को यान्सन, एडेन मार्कराम (कर्णधार), क्रेग ओव्हरटन, कॅलेब सेलेका, अँडिले स्वायत्ते, ट्रायब्स, सेंट स्ट्राइब्स, क्रेग ओव्हरटन, ॲडन मार्करम, रोलॉफ व्हान देर मर्व , टोनी डी झॉर्झी.