Join us

'हॉट' पंजाबी नायिकेशी केएल राहुलचं 'गॅटमॅट'; बघा कसं सुरू आहे 'चॅट'

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 13:24 IST

Open in App

नवी दिल्ली -  मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आम्ही फक्त मित्र असल्याचे निधीने स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. पण आता केएल राहुल आणि पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा यांच्यात झालेले चॅटींग चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये  'गॅटमॅट' सुरु असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 

गेल्या आठवड्यात सोनम बाजवाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती. सुर्यास्त पाहताना तुझ्याबाबात विचार करत आहे असे लिहले होते. त्यावर राहुलने कमेंट करत म्हणाला, एका हाकेच्या अंतरावर आहे. त्यावर सोनमने हार्टचे इमोजी टाकत राहुलला डेटसाठी विचारले. त्यावर उत्तर देताना राहुलने संभ्रमात असलेली इमोजी टाकली.  राहुल-सोनमच्या या चॅटींगचा स्क्रीन शॉट चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटीझन्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

आयपीएलच्या 11 व्या सत्रात राहुलने धमाकेदार फलंदाजी केली होती. सध्या राहुल भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. यापूर्वी राहुलचे नाव अभिनेत्री निधी अग्रवाल आणि मॉडेल नाहरसोबत जोडले गेले होते. आता पंजाबी अभिनेत्री सोनम बावजासोबत त्याच्या गॅटमॅटच्या चर्चा आहेत. सोनम बाजवाचा पंजाबी चित्रपट 'कॅरी ऑन जट्टा-2' रिलीज झाला आहे. 

टॅग्स :लोकेश राहुलरिलेशनशिप