Join us

WTC 2023 Final नंतर काय आहे टीम इंडियाचं शेड्युल, नोट करून ठेवा

लंडनच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारीने उतरणार आहेत. जाणून घ्या यानंतर काय आहे संघाचं वेळापत्रक.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 09:14 IST

Open in App

लंडनच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारीने उतरणार आहेत. भारत दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहे, पण ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली आहे. ११ किंवा १२ (रिझर्व्ह डे) जून पर्यंत या सामन्याचा निकाल लागणार आहे. परंतु टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक कसं आहे याबद्दल आपण माहिती घेऊ. भारतीय संघाला WTC फायनल नंतर एका महिन्याचा मोठा ब्रेक मिळणार आहे. परंतु यानंतर भारतीय संघाला वेस्ट इंडिजमध्ये सीरिज खेळायची आहे.क्रिकबझच्या वृत्तानुसार, WTC फायनलनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. पुढील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन सामने डॉमिनिका आणि त्रिनिदाद येथे खेळवले जातील. हे सामने १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान असतील. यानंतर, बार्बाडोसच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.

मालिकेतील तिसरा सामना १ ऑगस्टला त्रिनिदाद येथे होणार आहे. त्याच वेळी, यानंतर पाच सामन्यांची T20I मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिले तीन सामने त्रिनिदाद आणि गयाना येथे होणार आहेत. तर, पुढील दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आयोजित केले जाणार आहेत. या मालिकेमुळे भारतीय संघाला पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी टी २० विश्वचषकाची तयारी करण्यात मदत होईल.

हे असेल संभाव्य वेळापत्रक१२ ते १६ जुलै: पहिला कसोटी सामना, डॉमनिका२० ते २४ जुलै: दुसरा कसोटी सामना, त्रिनिदाद२७ जुलै: पहिला एकदिवसीय सामना, बारबाडोस२९ जुलै: दुसरा एकदिवसीय सामना, बारबाडोस१ ऑगस्ट: तिसरा एकदिवसीय सामना, त्रिनिदाद४ ऑगस्ट : पहिला T20I सामना, त्रिनिदाद६ ऑगस्ट: दुसरा T20I सामना, गयाना८ ऑगस्ट: तिसरा T20I सामना, गयाना१२ ऑगस्ट: चौथा T20I सामना, फ्लोरिडा१३ ऑगस्ट: पाचवा T20I सामना, फ्लोरिडा

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज
Open in App