Join us

जेव्हा सासू अचानक घरी तेव्हा काय होतं... सांगतोय वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग म्हणजे स्फोटक फलंदाज, हीच त्याची ओळख क्रिकेटच्या मैदानात होती. पण क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडल्यावर मात्र तो किती हलकं-फुलकं आणि मार्मिक बोलू शकतो, हे पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 15:41 IST

Open in App
ठळक मुद्देप्रत्येक विवाहित जोडप्याला आपलासा वाटेल असा व्हीडीओ पोस्ट केला आहे. हे ऐकल्यावर लगेच तुमच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील.

नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवाग म्हणजे स्फोटक फलंदाज, हीच त्याची ओळख क्रिकेटच्या मैदानात होती. पण क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडल्यावर मात्र तो किती हलकं-फुलकं आणि मार्मिक बोलू शकतो, हे पाहायला मिळालं. कारण सेहवाग ज्यापद्धतीने ट्विटरवर आपल्या पोस्ट टाकत असतो, ते पाहिल्यावर सेहवागच्या चाणाक्षपणाला दाद द्याविशी वाटते. सध्याच्या घडीला सेहवागने एक व्हीडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि तो चांगलाच वायरल झाला आहे.

ट्विटरवर सेहवाग नेमका कोणत्या विषयावर बोलेल, याचा काही नेम नसतो. यावेळी तर त्याने प्रत्येक विवाहित जोडप्याला आपलासा वाटेल असा व्हीडीओ पोस्ट केला आहे. हे ऐकल्यावर लगेच तुमच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील. पण तुम्ही जसा विचार करताय अगदी तसेच त्या व्हीडीओमध्ये नाही.

सेहवागने ट्विटरवर व्हीडीओ पोस्ट केला आणि त्या खाली '' जेव्हा घरी अचानकपणे सासू येते, तेव्हा कशी अवस्था होते... '' अशी ओळ लिहीली आहे. हा व्हीडीओ पाहिल्यावर तुम्हाला त्याने या ओळींमध्ये नेमके काय सुचवले आहे, हेदेखील उलगडत जाईल. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हीडीओ पाहायलाच हवा.

टॅग्स :विरेंद्र सेहवागट्विटरक्रिकेट