Join us

असं काय बोलला हार्दिक पांड्या, त्यामुळं ठरला खलनायक!

भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूनं सामाजिक भान राखणं किती गरजेचं आहे, याचे महत्त्व हार्दिक पांड्या प्रकरणानंतर अनेकांना कळलं असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 10:00 IST

Open in App
ठळक मुद्देकॉफी विथ करण 6 मधील विधान महागात पडलंहार्दिक पांड्या व लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

मुंबई : भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूनं सामाजिक भान राखणं किती गरजेचं आहे, याचे महत्त्व हार्दिक पांड्या प्रकरणानंतर अनेकांना कळलं असेल. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विवादास्पद वक्तव्यानंतर पांड्यावर सडकून टीका झाली. इतकेच काय तर त्याच्यासह या कार्यक्रमाला उपस्थिली असलेल्या लोकेश राहुललाही निलंबित करण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून दोघांना मायदेशात परतावे लागले. पांड्याचे ते विधान महिलांचा अपमान करणारे होते आणि नेटिझन्सचा वाढता रोष लक्षात घेता पांड्या व राहुलचा एपिसोड डिलीट करण्यात आला. 

'लैंगिकवादी, महिलाविरोधी आणि जातीयवादी' असे पांड्याला ठरवण्यात आले. या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या जातात आणि त्या ओघात पांड्या ते विधान करून बसला. त्यानंतर त्याने जाहीर माफीही मागितली, परंतु त्याच्या माफीवर समाधानी न झालेल्या प्रशासकीय समितीने पांड्यासह राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणाची कारवाई होईपर्यंत या दोघांना क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय, की ज्यामुळे तो खलनायक ठरला. करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''कुटुंबीयही  किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडूहार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.

टॅग्स :हार्दिक पांड्यालोकेश राहुलकॉफी विथ करण 6करण जोहरबीसीसीआय