Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समिती अध्यक्ष काय म्हणाले, वाचा...

धोनी लवकरच निवृत्त होणार, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आज भाष्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 16:28 IST

Open in App

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन मालिकांसाठी आज भाताचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. पण विश्वचषकातील पराभवानंतर विराटचे धाबे दणाणले आणि त्याने या मालिकांमध्ये खेळायचा निर्णय घेतला. पण धोनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहीला. धोनी नसल्यामुळे रीषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. धोनी लवकरच निवृत्त होणार, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आज भाष्य केले आहे.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन  टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केली. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पुनरागमन केले आहे. तर विंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला पर्याय म्हणून रीषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी  एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीला कर्णधार विराट कोहली हासुद्धा उपस्थित होता.  येत्या ३ ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

धोनीबाबत प्रसाद यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यानंतर प्रसाद म्हणाले की, " धोनी निवृत्त कधा होणार किंवा अखेरचा सामना कधी खेळणार, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण हा निर्णय धोनीचा आहे आणि त्यानेच तो घ्यायचा आहे. पण याबाबत आमच्यामध्ये याबाबत चर्चा झाली आहे. धोनीने क्रिकेटमधील भविष्याबद्दल माझ्याशी चर्चा केली आहे."

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतवेस्ट इंडिजविराट कोहलीशिखर धवन