Join us

मॅक्सवेलचे करायचे काय? १०.७५ कोटींचा खेळाडू पंजाबसाठी ‘फ्लॉप’

स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या या खेळाडूने  नऊ सामन्यात  एकही षटकार मारला नाही.  गेल्या वर्षी झालेल्या लिलावात मॅक्सवेलला पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 10:23 IST

Open in App

अबूधाबी: यंदा आयपीएलमध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या महाग फलंदाजांच्या यादीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल याचा नंबर पहिला आहे. १०.७५ कोटींना विकत घेतलेल्या मॅक्सवेलने अत्यंत खराब कामगिरी केली. आतापर्यंत ९ सामन्यात त्याने केवळ ५८ धावा केल्या. याशिवाय एक गडी बाद केला. त्याची सर्वोच्च खेळी आहे, नाबाद १३ धावा.

स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या या खेळाडूने  नऊ सामन्यात  एकही षटकार मारला नाही.  गेल्या वर्षी झालेल्या लिलावात मॅक्सवेलला पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. याआधी २०१४ साली देखील त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. मॅक्सवेलकडून यावेळी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याने सर्वांना निराश केले.

 पंजाबने सर्व सामन्यात त्याला संधी दिली. तरी देखील मॅक्सवेल चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने फक्त ५ चौकार मारले आहेत. मॅक्सवेलच्या खराब कामगिरीमुळे संघाचा त्याच्यावरील विश्वास कमी होत चालला आहे. मुंबई विरुद्ध दुसऱ्या  सुपर ओव्हरमध्ये ख्रिस गेलसोबत मयांक अग्रवालला पाठवले. खर तर मॅक्सवेल हा हार्ड हिटसाठी ओळखळा जातो. पण खराब फॉर्ममुळे संघाने त्याचा विचार केला नाही. याच कारणामुळे कोलकाताविरुद्ध देखील प्रभसिमरनला आधी फलंदाजीसाठी पाठवले होते.

ग्लेन मॅक्सवेल9    सामने58    धावा1     बळी सर्वोच्च - नाबाद 13 धावा

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबग्लेन मॅक्सवेलआयपीएल