Join us  

Big News : पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात व कोणाला भिडणार; न्यूझीलंडची माघार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं अनपेक्षित कामगिरी करताना जेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघानं पार निराश केले आणि त्यांना उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 7:54 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं अनपेक्षित कामगिरी करताना जेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघानं पार निराश केले आणि त्यांना उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. आजपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. ऑस्ट्रेलियात ही वर्ल्ड कप स्पर्धा  १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पार पडणार आहे. पण, त्याआधी वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेट चाहत्यांना आणखी एका वर्ल्ड कपची मेजवानी अनुभवता येणार आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ असा हा वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यात टीम इंडियाला सोपा ड्रॉ मिळाला आहे.

वेस्ट इंडिजमध्ये १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे आणि त्याचे वेळापत्रक आज जाहीर झाले. १६  देशांचा सहभाग असलेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत ४८ सामने खेळवले जाणार आहेत. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतून जगाला विराट कोहली, बाबर आजम, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन आणि शिमरोन हेटमायर असे स्टार खेळाडू मिळाले. त्यामुळेच या वर्ल्ड कपमध्ये युवा खेळाडूंच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा असतात. अँटिग्वा व बार्मुडा, गयाना, सेंट किट्स व नेव्हिस आणि त्रिनिदाद व टोबॅगो या चार  कॅरेबियन देशांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. क्वारंटाईन नियमांमुळे न्यूझीलंडनं या स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्यांच्याजागी स्कॉटलंडला संधी मिळाली आहे. स्कॉटलंडला D गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचा सामना करायचा आहे. २०१६मध्ये वेस्ट इंडिजनं ही स्पर्धा जिंकली होती. स्पर्धेचे उपांत्य फेरीचे व फायनल लढत सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, अँटिग्वा व बर्मुडा येथे होईल.  

गटवारी ( ICC U19 Men’s Cricket World Cup Groupings)Group A - बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा,  अमेरिका Group B - भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, यूगांडाGroup C - अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वेGroup D - ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज  

भारतीय संघाचे वेळापत्रक ( Schedule of Indian team in the U-19 WC 2022) १५  जानेवारी, वि. दक्षिण आफ्रिका१९ जानेवारी, वि. आयर्लंड२२ जानेवारी, वि. यूगांडा 

टॅग्स :आयसीसीभारतीय क्रिकेट संघ
Open in App