T20 WC 2026 : कसा आहे WI vs SA यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड! आकडेवारी टीम इंडियाला दिलासा देणारी की,...

दोन्ही संघातील लढत टीम इंडियासाठी असेल महत्त्वपूर्ण कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 23:56 IST2026-02-25T23:42:03+5:302026-02-25T23:56:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
West Indies vs South Africa LIVE Streaming ICC T20 World Cup 2026 Match Important For Team India When And Where To Watch Know WI vs SA Head To Head Record | T20 WC 2026 : कसा आहे WI vs SA यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड! आकडेवारी टीम इंडियाला दिलासा देणारी की,...

T20 WC 2026 : कसा आहे WI vs SA यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड! आकडेवारी टीम इंडियाला दिलासा देणारी की,...

West Indies vs South Africa LIVE Streaming ICC T20 World Cup 2026 Match : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना गुरवारी, २६ फेब्रुवारीला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रातील ही लढत दोन्ही संघासाठी गुणतालिकेत अव्वलस्थानासाठी तर महत्त्वपूर्ण आहेच. याशिवाय या लढतीवर टीम इंडियाच्या सेमीचे भवितव्यही अवलंबून आहे. इथं एक नजर टाकुयात हा सामना कधी अन् कुठे पाहाता येईल?  कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड? खेळपट्टी कुणाला देईल साथ? यासंदर्भातील सविस्तर माहिती. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

सुपर ८ मध्ये दोन्ही संघाची दमदार कामगिरी

सुपर ८ मधील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनेझिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात वेस्ट इंडिजच्या संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघानेत गतविजेत्या टीम इंडियाविरुद्ध ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवत फलंदाजी आणि गोलंदाजीतील संतुलन दाखवले होते. त्यामुळे ही लढत जबरदस्त होईल, अशी अपेक्षा आहे. या सामन्यातील विजत्याचे सेमीचं तिकीट जवळपास निश्चत होईल. अहमदाबादमधील हवामान क्रिकेट सामन्यासाठी अनुकूल राहिल, असा अंदाज आहे. सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना पोषक ठरू शकते. चांगली उसळी आणि कॅरीमुळे फटकेबाजी सोपी होईल. पण त्यानंतर फिरकीपटूंना इथं मदत मिळेल.

T20 World Cup 2026 : श्रीलंकेचा खेळ खल्लास! न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानचाही 'करेक्ट कार्यक्रम'?

सामना कधी आणि कुठे रंगणार? कशी पाहता येईल WI vs SA यांच्यातील लढत?
 
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर ८ फेरीतील सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. अर्धातास अगोदर दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.भारतात जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रेक्षपण केले जाईल.

कशी आहे वेस्ट इंडिज -दक्षिण आफ्रिका यांची एकमेकांविरुद्धची आकडेवारी (WI vs SA Head to Head Record In T20I)

दोन्ही संघात आतापर्यंत २९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १४ तर वेस्ट इंडिजच्या संघाने १५ सामने जिंकले आहेत. मागील पाच सामन्यात दोन्ही संघ अपराजित आहेत. ही आकडेवारी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा ठरेल. पण आकडेवारीत वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिकेच्या एक पाऊल पुढे दिसतो.

दक्षिण आफ्रिका विजय टीम इंडियाच्या फायद्याचा 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय टीम इंडियासाठी सेमीचं समीकरण सोपे करणारा आहे. याउलट वेस्ट इंडिजने बाजी मारली तर टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान टिकणे मुश्कील होईल. कारण वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात १०७ धावांनी विजय मिळवत निव्वळ धावगती कमालीची उंचावली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाची धावगती मायनसमध्ये आहे. दोन सामन्यात वेस्ट इंडिजची बरोबरी करणं सहज सोपे नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघासह चाहते दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकावा, अशी प्रार्थना करतील. हा निकाल मनासारखा लागला म्हणजे सगळं ठीक झालं असंही नाही. त्यानंतर भारतीय संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. यातील एक सामना भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच खेळणार आहे.

Web Title : WI vs SA हेड-टू-हेड रिकॉर्ड: टी20 WC 2026 भारत पर प्रभाव

Web Summary : वेस्टइंडीज और दक्षिण अफ्रीका टी20 विश्व कप के सुपर 8 में भारत के लिए महत्वपूर्ण मुकाबले में भिड़ेंगे। हेड-टू-हेड रिकॉर्ड में वेस्टइंडीज का पलड़ा थोड़ा भारी है। यह मैच अहमदाबाद में होगा और दोनों टीमों की सेमीफाइनल की उम्मीदों के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : WI vs SA Head-to-Head Record: T20 WC 2026 Impact on India

Web Summary : West Indies and South Africa clash in a crucial T20 World Cup Super 8 match with implications for India. The head-to-head record favors West Indies slightly. The match will be held in Ahmedabad and is crucial for both teams' semi-final hopes.