Join us

वेस्ट इंडिजच्या संघाचं नेपाळमध्ये असं स्वागत; अनेकांची टीका, तर काहींनी दिली दाद!

नेपाळ आणि वेस्ट इंडिजच्या अ संघामध्ये पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 17:49 IST

Open in App

NEP vs WI: भारतात सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात जगभरातील नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएल सुरू असताना क्रिकेट विश्वाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असते. पण, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे सर्वांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटने लक्ष वेधले आहे. पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. अशातच वेस्ट इंडिज अ संघाचे नेपाळमध्ये ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले तो चर्चेचा विषय बनला आहे.  

दरम्यान, वेस्ट इंडिजच्या संघाचे शिलेदार नेपाळच्या धरतीवर उतरल्यानंतर स्वतः त्यांचे सामान नेत असल्याचे दिसते. खुद्द खेळाडू आपापल्या सामानाची वाहतूक करत असल्याने अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली. तर काहींनी कॅरेबियन खेळाडूंच्या या कृतीवरून त्यांना दाद दिली. बसमधून उतरल्यानंतर खेळाडूंनी हॉटेलपर्यंत सामानाची वाहतूक केली. तसेच संघासाठी उपलब्ध असलेली बस देखील चांगल्या दर्जाची नव्हती. प्रथमच आंतरराष्ट्रीय संघांसाठी अशी बस पाहायला मिळाली.

नेपाळ आणि वेस्ट इंडिजच्या अ संघामध्ये पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. शनिवारपासून या मालिकेला सुरुवात होईल. अखेरचा सामना ४ मे रोजी होणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने नेपाळसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. मालिकेतील पहिला सामना २७ एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना रविवार २८, त्यानंतर तिसरा सामना १ मे, चौथा सामना २ मे आणि पाचवा सामना ४ मे रोजी खेळवला जाईल.

टॅग्स :नेपाळवेस्ट इंडिजआंतरराष्ट्रीय क्रिकेटटी-20 क्रिकेट