WI vs AUS Mitchell Owen Makes World Record In His T20I Debut : वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने आता टी-२० मालिकेची सुरुवातही अगदी धमाक्यात केलीये. जमैका येथील सबिना पार्क, किंग्सटनच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या मिचेल ओवन (Mitchell Owen) याने अष्टपैलू कामगिरीसह टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजी करताना एक विकेट घेतली अन् धावांचा पाठलाग करताना फिफ्टी ठोकली
पहिल्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या होत्या. गोलंदाजी वेळी मिचेल ओव्हन याने एक षटक टाकताना शाई होपच्या रुपात आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. एवढेच नाही तर धावांचा पाठलाग करताना त्याने २६ चेंडूत ५ षटकात आणि २ चौकाराच्या मदतीने ५० धावांची उपयुक्त खेळी केली. अष्टपैलू कामगिरीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
असा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
पूर्ण वेळ सदस्य असलेल्या संघाकडून पदार्पणातील टी-२० सामन्यात एक विकेट आणि अर्धशतक झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. त्याने १६ वर्षांचा विक्रम मोडीत काढत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डेर मर्व याने २००९ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना १ विकेट आणि ४८ धावा केल्या होत्या. एकंदरीत आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यांचा विचार करता ऑयर्लंडच्या सिमी सिंग याने २०१८ मध्ये नेदरलंड्सविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना ५७ धावा आणि ३ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकवणारा तिसरा ऑस्ट्रेलियन
फिल सॉल्ट याच्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. सॉल्टने २०२२ मध्ये बारबाडोसच्या मैदानात वेस्टइंडिज विरुद्ध अर्धशतक झळकावले होते. याशिवाय टी-२० पदार्पणात अर्धशतक झळकवणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज ठरलाय. याआधी डेविड वॉर्नर आणि रिकी पाँटिंग याने अशी कामगिरी करून दाखवली होती.
पदार्पणाच्या टी-२० सामन्यात एक विकेट अन् सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (पूर्णवेळ सदस्यीय संघ)
- मिचेल ओवेन ५० धावा आणि १ विकेट ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२५)
- रॅसी व्हॅन डेर मर्व ४८ धावा आणि १ विकेट दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००९)
- पॉल कॉलिंगवुड ४६ धावा आणि २ विकेट्स इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया साउथहॅम्प्टन (२००५)
- हुसेन तलत ४१ धावा आणि १ विकेट पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (२०१८)
- सनथ जयसूर्या ४१ धावा आणि २ विकेट श्रीलंका विरुद्ध इंग्लंड साउथहॅम्प्टन (२००६)
Web Title: West Indies vs Australia 1st T20I Mitchell Owen Makes World Record In His T20I Debut Match At Kingston
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.