आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला अजून वर्षभर अवधी आहे. पण सध्या या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्यासाठी तगडी शर्यत पाहायला मिळत आहे. दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ या शर्यतीत मागे पडण्याची चित्र निर्माण झाले आहे. इथं जाणून घेऊयात आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठीचे निकष अन् वेस्ट इंडिज संघाचे स्थान धोक्यात येण्यामागचं कारण...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!दोन यजमानांना थेट प्रवेश, नामिबियासाठी क्वालिफायर प्रत्येक ४ वर्षांनी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येते. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यानेही आगामी वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा रंगणार आहे. यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी आधीच आपली जागा पक्की केली आहे. पण नामिबियाला पात्रता फेरी खेळून यावे लागेल, कारण हा संघ ICC चा नियमित सदस्य संघापैकी नाही. उर्वरित आठ संघांचा निर्णय वनडे रँकिंगच्या आधारे होणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या खेळाडू प्रमाणेच सगळ्यांवर कारवाई होईल; मोहसिन नक्वींची परदेशी खेळाडूंना धमकी
वनडे क्रमवारीतील स्थान अन् वर्ल्ड कप पात्रतेसाठीचे समीकरण
आयसीसीने ठरवल्यानुसार, मार्च २०२७ पर्यंत वनडे क्रमवारीत आघाडीच्या ८ स्थानावरील संघ थेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरतील. इतर संघांना पात्रता फेरीत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. सध्याच्या घडीला बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. जर क्रमवारीत सुधारणा झाली नाही तर या संघांवर वर्ल्ड कप खेळण्यासाठी पात्रता फेरीच्या लढती महत्त्वपूर्ण ठरतील. दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन संघ आहे वेस्ट इंडिज
वेस्ट इंडिजच्या संघाने १९७५ आणि १९७९ सलग दोन हंगामात वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे. १९८३ मध्येही ते फायनलपर्यंत पोहचले. पण यावेळी कपिल पाजींच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कॅरेबियन संघाला रोखत इतिहास रचला. ऐकेकाळी वनडे क्रिकेटमध्ये दबदबा दाखवून देणारा हा संघ वनेड वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र होण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
Web Summary : Two-time champion West Indies faces a tough road for direct entry into the 2027 ODI World Cup. Host nations South Africa and Zimbabwe are already qualified. West Indies may need to play qualifiers based on their ODI ranking. Their current ranking puts direct qualification in jeopardy.
Web Summary : दो बार के चैंपियन वेस्ट इंडीज को 2027 वनडे वर्ल्ड कप में सीधे प्रवेश के लिए कड़ी चुनौती का सामना करना पड़ रहा है। मेजबान दक्षिण अफ्रीका और जिम्बाब्वे पहले ही क्वालीफाई कर चुके हैं। वेस्ट इंडीज को अपनी वनडे रैंकिंग के आधार पर क्वालीफायर खेलने की आवश्यकता हो सकती है। उनकी वर्तमान रैंकिंग सीधे क्वालीफिकेशन को खतरे में डालती है।