टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील भारतीय संघाविरुद्धच्या पराभवासह वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना १ मार्चला झाला. या लढतीनंतर अजूनही कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतलेले नाहीत. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे अनेक देशांतील एरस्पेस बंद आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज संघातील खेळाडू भारतातच अडकून आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यात खेळाडूंना सुरक्षित घरी पोहचवण्यासंदर्भात चर्चा सुरु असताना संघातील एका खेळाडूने थेट रोनाल्डोकडे मदत मागितल्याची गोष्टही चर्चेत आली आहे.
क्रिकेटरनं रोनाल्डोला विमान पाठवण्यासंदर्भात शेअर केली पोस्ट
वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील अकिल होसीन याने तर थेट फुटबॉल जगतातील स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्याकडेच मदत मागितली आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की, ख्रिस्टियानो रोनाल्डोला विमान पाठवून आम्हाला वाचव असं म्हणावे वाटते, अशी इन्स्टा पोस्ट कॅरेबियन स्टार क्रिकेटरनं केली आहे.
रोनाल्डोचं महागडे जेट
रोनाल्डो हा क्रीडा जगतातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. तो जवळपास ७५० कोटी रुपयांच्या 'ब्लॅक बीस्ट जेटचा मालकही आहे. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण वातावरणात ख्रिस्टियानो रोनाल्डोचे खासगी विमान सौदी अरेबियातून स्पेनला गेल्याची गोष्ट चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता कॅरेबियन खेळाडूनं रोनाल्डोकडेच मदतीला येऊ शकतो, ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
अंधश्रद्धा की 'अपशकुन'? T20 World Cup फायनलआधी टीम इंडियानं बदलला मुक्काम! कारण...
लवकरच संघातील खेळाडू मायदेशी परततील, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही दिली माहिती
वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर भारतात अडकून असलेल्या खेळाडूंना लवकरच आपल्या घरी सुरक्षित पोहचतील, अशी माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिली आहे. आम्ही संघ व्यवस्थापन आणि आयसीसी क्रिकेट परिषदेच्या संपर्कात आहोत. मध्यपूर्वेत सुरक्षा कारणांमुळे एअरस्पेस बंद करण्यात आले असून त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वेस्ट इंडिजतच्या संघाला सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. पुढील २४ तासांत संघ मायदेशी परतेल, असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.
Web Summary : West Indies cricketers are stuck in India after the T20 World Cup due to Middle East airspace closures. Akeal Hosein jokingly appealed to Cristiano Ronaldo for a flight home. The West Indies cricket board assures players will return home safely soon.
Web Summary : टी20 वर्ल्ड कप के बाद वेस्टइंडीज के क्रिकेटर मध्य पूर्व में हवाई क्षेत्र बंद होने के कारण भारत में फंसे हुए हैं। अकील होसेन ने मजाक में क्रिस्टियानो रोनाल्डो से घर के लिए उड़ान भरने की अपील की। वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड ने खिलाड़ियों को जल्द सुरक्षित घर लौटने का आश्वासन दिया है।