Join us

WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

West Indies vs Pakistan, 3rd ODI : वेस्ट इंडिजनं या संघाविरुद्ध नोंदवलाय सर्वाधिक मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:42 IST

Open in App

West Indies vs Pakistan, 3rd ODI : कॅरेबियन येथील  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ब्रायन लारा स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम केला. घरच्या मैदानावरील वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅरेबियन संघानं कर्णधार आणि विकेट किपर बॅटर शाइ होपच्या (Shai Hope) शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात २९४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २९.२ षटकात अवघ्या ९२ धावांवर आटोपला. २०२ धावांनी सामना जिंकत कॅरेबियन संघाने  ३४ वर्षांचा दुष्काळ संपवत पाकिस्तान विरुद्ध मालिका जिंकली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असं पहिल्यांदाच घडलं

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात २०२ धावांनी विजय नोंदवत वेस्ट इंडिजच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटच्या आपल्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा विजय नोंदवला. पाकिस्तान संघाला त्यांनी पहिल्यांदाच २०० पेक्षा अधिक धावांनी पराभूत करून दाखवलं आहे. याआधी २०१५ मध्ये वेस्ट इंडिज संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला १५० धावांनी मात दिली होती.  १९७५ पासून दोन्ही देशांत एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. पण पहिल्यांदाच वेस्ट इंडिजनं पाकविरुद्ध एवढ्या मोठ्या अंतराने विजय नोंदवला आहे.

स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

वेस्ट इंडिजनं या संघाविरुद्ध नोंदवलाय सर्वाधिक मोठा विजय

वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासात वेस्ट इंडिजच्या संघाने २०११ मध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला होता. नेदरलंड संघाला त्यांनी २१५ धावांनी पराभूत केले होते. याशिवाय २०१० मध्ये कॅनडाच्या संघाविरुद्ध वेस्ट इंडिज संघाने २०८ धावांनी विजय मिळवला होता. २०१४ मध्ये न्यूझीलंडच्या संघाला त्यांनी २०३ धावांनी मात दिली होती. पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

पाकच्या संघातील फक्त तिघांनी गाठला दुहेरी आकडा 

शाइ होप याने या सामन्यात ९४ चेंडूत १२० धावांची खेळी केली. लुईस याने ५४ चेंडूत ३७ धावा तर  जस्टिन ग्रीव्ह्स २४ चेंडूत नाबाद ४३ धावा कुटल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि अब्रार अहमद याने प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या, आयुब अन् मोहम्मद नवाझ  यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. सलमान आगा ३०(४९), हसन नवाझ १३ (४०) आणि मोहम्मद नवाझ २३ (२८) या तिघांनीच दुहेरी आकडा गाठला. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्स (Jayden Seales) याने ६ विकेट्स घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला.

टॅग्स :वेस्ट इंडिजपाकिस्तानआयसीसी