Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिन तेंडुलकरने वाहिली श्रद्धांजली!

मुंबई इंडियन्सचे खेळाडू कृणाल आणि हार्दिक पांड्या ( Krunal - Hardik Pandya) यांच्या वडिलांच्या निधनाचे दु:ख ताजे असताना संघातील आणखी एका खेळाडूच्या डोक्यावरील पितृछत्र हरवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 20:51 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचे खेळाडू कृणाल आणि हार्दिक पांड्या ( Krunal - Hardik Pandya) यांच्या वडिलांच्या निधनाचे दु:ख ताजे असताना संघातील आणखी एका खेळाडूचे पितृछत्र हरवले. वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या ( Kieron Pollard) वडिलांचे निधन झाले आहे. पोलार्डने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने नुकतंच वन डे आणि टी-20 मालिकेत श्रीलंकेला पराभूत केलं. 

पोलार्डने वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले की,"तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुमच्यावरील प्रेम सदैव कायम राहिल. तुम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतच राहू. तुम्ही चांगल्या ठिकाणी असेल, हे मला माहित आहे." 

सचिन तेंडूलकरने वाहिली श्रद्धांजली

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ( Sachin Tendulkar) पोलार्डच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. ” तुझ्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली आहे. या दु: खाच्या प्रसंगी मी शोक व्यक्त करतो. देव तुम्हाला या सामर्थ्य देईल”, असे सचिनने ट्विट केले. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डवेस्ट इंडिज