ख्रिस गेल '१४ हजारी'; T20 सामन्यांत १४ हजार धावा करणारा ठरला पहिला फलंदाज 

Chris Gayle T20 : T20 सामन्यांत १४ हजार धावा करणारा ठरला पहिला फलंदाज. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची हॅट्‌ट्रिक. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:44 AM2021-07-14T07:44:32+5:302021-07-14T07:46:04+5:30

whatsapp join usJoin us
west indies Chris Gayle Became the first batsman to score 14000 runs in T20 matches | ख्रिस गेल '१४ हजारी'; T20 सामन्यांत १४ हजार धावा करणारा ठरला पहिला फलंदाज 

ख्रिस गेल '१४ हजारी'; T20 सामन्यांत १४ हजार धावा करणारा ठरला पहिला फलंदाज 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देT20 सामन्यांत १४ हजार धावा करणारा ठरला पहिला फलंदाज.ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची हॅट्‌ट्रिक. 

ग्रोस आइलेट : ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने सलग तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवताना ६ गड्यांनी बाजी मारली. या शानदार विजयासह विंडीजने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.  सामनावीर गेलने टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा गाठताना ऐतिहासिक कामगिरीही केली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेतली. मात्र, त्यांना २० षटकांत केवळ ६ बाद १४१ धावांचीच मजल मारता आली. यानंतर गेलच्या जोरावर विंडीजने १४.५ षटकांमध्येच ४ बाद १४२ धावा काढल्या. गेलने ३८ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांचा पाऊस पाडत ६७ धावांचा विजयी तडाखा दिला. मार्च २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद १०० धावा केल्यानंतर पहिल्यांदाच गेलने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ५० हून अधिक धावा फटकावल्या. 

अव्वल फलंदाज

ख्रिस गेल            ४३१     १४०३८
पोलार्ड               ५४५     १०८३६
शोएब मलिक     ४२५     १०७४१
डेव्हिड वॉर्नर      ३०४     १००१७

Web Title: west indies Chris Gayle Became the first batsman to score 14000 runs in T20 matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.