AUS vs WI, 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात घरच्या मैदानात खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची चांगलीच फजिती झालीये. जमैका येथील किंगस्टनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात २०४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २७ धावांवर आटोपला. कसोटी क्रिकेटमधील एका डावातील ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. एवढेच नाही तर या सामन्यात कसोटीत एका डावात सर्वाधिक फलंदाज शून्यावर बाद होण्याचा लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्डही आता कॅरेबियन संघाच्या नावे झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर कॅरेबियन फलंदाजांनी टेकले गुडघे
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्येचा नकोसा रेकॉर्ड न्यूझीलंड संघाच्या नावे आहे. १९५५ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात किवींचा संघ अवघ्या २६ धावांवर आटोपला होता. मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर कॅरेबियन फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. कसोटीतील एका डावात दहाव्या वेळी एका संघाच्या ताफ्यातील ६ पेक्षा अधिक गडी खातेही न उघडता बाद झाल्याचे पाहायला मिळाले.
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
कसोटी क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड
- न्यूझीलंड २६ धावा विरुद्ध इंग्लंड १९५५ (तिसऱ्या डावात)
- वेस्ट इंडीज २७धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०२५ (चौथ्या डावात)
- दक्षिण आफ्रिका ३० धावा विरुद्ध इंग्लंड १८९६ (चौथ्या डावात)
- दक्षिण आफ्रिका ३० धावा विरुद्ध इंग्लंड १९२४ (दुसऱ्या डावात)
७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
मिचेल स्टार्कनं सर्वात कमी चेंडूत ५ विकेट्सचा डाव साधताना या सामन्यात एकूण ६ विकेट्स घेतल्या. त्याने चौघांना शून्यावर तंबूत धाडले. वेस्ट इंडीजच्या संघातील ७ फलंदाज शून्यावर बाद झाले. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघातील ७ फलंदाजांच्या पदरी भोपळा पडला आहे.
ऑस्ट्रेलियानं कॅरेबियन संघाला घरच्या मैदानात दिला 'वाईट वॉश'
वेस्ट इंडिज विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका आधीच खिशात घातली होती. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात १७६ धावांनी विजय मिळवत कांगारूंनी कॅरेबियन संघाला व्हाइट वॉश दिला.
Web Title: West Indies Bowled Out For 27 Runs And 7 Ducks In Second Innings Is The Most Ducks In An Innings In The History Of Test Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.