Join us  

Breaking News : जुलै महिन्यात 'ही' टीम करणार इंग्लंड दौरा; जाणून घ्या कधी व कुठे खेळणार 

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 3:41 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट कायम आहे. त्यात ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होत आहे. अशात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं संघाच्या इंग्लंड दौऱ्याला मान्यता दिली असून जैवसुरक्षिततेत खेळण्याची तयारी दर्शवली आहे.

वेस्ट इंडिजचा संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी येणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. आता जुलैमध्ये विंडीज संघ इंग्लंडमध्ये येणार आहे. ''वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून इंग्लंड दौऱ्याला मान्यता देण्यात आली आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाचे वैद्यकिय अधिकारी आणि अन्य प्रतिनिधींनी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला,''असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

त्यात पुढे असं म्हटलं आहे की,''जैवसुरक्षिततेबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं प्लान आखले आहेत. त्यानुसारच हा दौरा होईल.'' इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8, 16 आणि 24 जुलैला कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड येथील हॅम्पशायर एजीस बाऊल आणि लँकशायर ओल्ड ट्रॅफर्ड येथे सामने होतील. दोन्ही मैदान खेळाडू राहत असलेल्या हॉटेल शेजारीच आहेत. या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ खेळाडूंना खासजी चार्टर विमानानं नेणार आहेत.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 45,653 इतकी झाली आहे. त्यापैकी 26 लाख 71,440 रुग्ण बरे झाले असून 3 लाख 67,116 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. 

मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!

बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!

कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली

युवराज सिंगचं मुंबईतील घर लय भारी; विराट कोहलीच्या घरापेक्षा डबल महाग!

बोंबला; क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्याला कोरोनाची लागण

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंडवेस्ट इंडिज