West Indies Announces Squad For India Test Series भारतीय दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना वेस्ट इंडिज संघाने काही मोठे निर्णय घेतले आहेत. माजी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट याला बाहेरचा रस्ता दाखवला असून दोन युवा खेळाडूंसह माजी अन् दिग्गज क्रिकेटपटूच्या पोराला कमबॅकची संधी दिलीये. वेस्ट इंडिजचा संघ २०१८-१९ नंतर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहे. हा दौरा संघासाठीी निश्चितच अधिक आव्हानात्मक असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चंद्रपॉल याला कमबॅकची संधी
भारत दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्यांनी माजी कर्णधार आणि महान खेळाडूंपैकी एक असलेल्या शिवनारायण चंद्रपॉलच्या मुलाला कमबॅकची संधी दिली आहे. तेगनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) पुन्हा एकदा कसोटीमध्ये आपली क्षमता दाखवताना दिसेल. याशिवाय एलिक एथानजे यालाही संघात स्थान मिळाले आाहे.
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
माजी कर्णधाराला दाखवला बाहेरचा रस्ता टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातून १० कसोटी सामने खेळणाऱ्या आणि संघाचे नेतृत्व केलेल्या ब्रेथवेटचा पत्ता कट झालाय. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आता तर तो संघातूनच बाहेर पडलाय. याशिवाय केसी कार्टी, जोहान लेने आणि मायकल लुईस यांचाही वेस्ट इंडिजच्या संघातून पत्ता कट झालाय.
या फिरकीपटूला मिळणार पदार्पणाची संधी
भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीचा विचार करून वेस्ट इंडिजच्या संघात खैरी पिएरे या डावखुऱ्या हाताच्या फिरकीपटूला पहिल्यांदाच संघात संधी मिळालीये. तो टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करताना दिसू शकते. उप-कर्णधार जोमेल वारिकन याच्यानंतर तो संघातील दुसरा फिरकीपटू असेल. जलदगती गोलंदाजीमध्ये अल्झारी जोसेफ, शामार जोसेफ, अँडरसन फिलिप आणि जेडन सील्स यांची संघात वर्णी लागलीये.
टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडिजचा संघ
वेस्ट इंडिजचा संघ टीम- रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उप-कर्णधार), केवलन अँडरसन, एलिक एथनाजे,जॉन कँपबेल, टेगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शामार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खैरी पिएरे, जेडन सील्स.
असा आहे वेस्ट इंडिज संघाचा भारत दौरा
२२ सप्टेंबरला वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यासाठी टेकऑफ करेल. २४ सप्टेंबरला ते अहमदाबाद येथे पोहचतील. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. १० ते १४ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळतील.