शाब्बास मुलींनो, विश्वचषकावर कोरले नाव, पहिला आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला

ICC Women's Under-19 Cricket World Cup: शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला ७ बळींनी नमवत पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 07:52 AM2023-01-30T07:52:24+5:302023-01-30T07:53:22+5:30

whatsapp join usJoin us
Well done girls, a name engraved on the world cup, India won the first ever ICC Women's Under-19 Cricket World Cup | शाब्बास मुलींनो, विश्वचषकावर कोरले नाव, पहिला आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला

शाब्बास मुलींनो, विश्वचषकावर कोरले नाव, पहिला आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोत्चेफस्ट्रूम : शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला ७ बळींनी नमवत पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, महिला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताचे हे पहिले विश्वविजेतेपद ठरले.

वरिष्ठ स्तरावर भारतीय संघाला तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी पहिला विश्वचषक पटकावून दिला.      

भारतीयांनी इंग्लंडला १७.१ षटकांत केवळ ६८ धावांमध्ये गुंडाळले. यानंतर, आवश्यक ६९ धावा तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १४ षटकांत पार करत भारतीय मुलींनी शानदार विश्वविजेतेपद पटकावले. 

भारतीय खेळाडूंची छाप
सर्वाधिक धावा :

nश्वेता सेहरावत (भारत) : २९७ धावा
nग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) : २९३ धावा
nशेफाली वर्मा (भारत) : १७२ धावा
nइमान फातिमा (पाकिस्तान) : १५७ धावा
nजॉर्जिया प्लिमर (न्यूझीलंड) : १५५ धावा.
सर्वाधिक बळी : 
nमॅगी क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : १२ बळी
nपार्श्वी चोप्रा (भारत) : ११ बळी
nहॅना बेकर (इंग्लंड) : १० बळी
nअनोसा नासिर (पाकिस्तान) : १० बळी
nग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) : ९ बळी

Web Title: Well done girls, a name engraved on the world cup, India won the first ever ICC Women's Under-19 Cricket World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.