Join us  

एकेकाळी ब्लडी इंडियन्स म्हणणारे आज आयपीएलमुळे भारतीयांचे तळवे चाटतायेत; भारतीय दिग्गजाचा जोरदार हल्लाबोल

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्यावर जून्या ट्विटमुळे आयसीसीनं बंदीची कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:46 PM

Open in App

भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज फारूख इंजिनियर (Farokh Engineer) यांनी इंग्लंडमध्ये आशियाई खेळाडूंवर होणाऱ्या वर्णद्वेषी टीकेवर आवाज उठवला आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्यावर जून्या ट्विटमुळे आयसीसीनं बंदीची कारवाई केली आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ही कारवाई सक्त असल्याचे मत व्यक्त केले होते आणि त्यावरही फारूख इंजिनियर यांनी टीका केली. प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारचं विधान करायला नको हवं, असे मत व्यक्त करताना इंजिनियर यांनी रॉबिन्सन याला शिक्षा देऊन इंग्लंड क्रिकेट मंडळानं योग्य पाऊल उचलले असल्याचे सांगितले. त्यानं चूक केली आणि त्याची शिक्षा मिळायलाच हवी. रॉृबिन्सननं 18 वर्षांचा असताना वर्णद्वेषी ट्विट केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केल्यानंतर त्याचं ते ट्विट व्हायरल झालंं अन् त्याच्यावर कारवाई झाली. पाकिस्तानचा संघ इंग्लंडला भिडणार, पण पाक चाहते सामने नाही पाहू शकणार; भारताकडे बोट दाखवत मंत्र्यांनी घेतला निर्णय 

 फारुख इंजिनियर यांनी इंग्लंडच्या कौंटी संघ लँकशायरकडून 175 सामने खेळले आहेत. 1968 ते 1976 या कालावधीत ते तेथे खेळले. आता ते लँकशायर क्लबचे सीनियर वाईस प्रेसीडेंट आहेत. जेव्हा ते इंग्लंडला खेळायला आले, तेव्हा येथील लोकांनी हिणवले. इंजिनियरनी त्यावेळीही आवाज उठवला होता. इतकेच नव्हे तर स्वतःच्या खेळानेही त्यांनी टीकाकारांची तोंड बंद केली होती. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आहे. ठरलं; राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी

ज्यॉफ्री बॉयकॉट ने म्हटले होते ब्लडी इंडियन्स

फारूख इंजिनियर यांनी नुकतंच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यात त्यांनी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ज्यॉफ्री बॉयकॉट हे ब्लडी इंडियन्स या शब्दाचा वापर करायचे, असे सांगितले. ते म्हणाले, बॉयकॉट यांची कमेंट एक उदाहरण आहे, मला त्यांनाच लक्ष्य करायचे नाही. पण, असे अनेक जणं होती की जे शब्दानं नाही तर वागणुकीनं अपमान करायचे. यात काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचाही समावेश होता.  जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार?

इंजिनियर म्हणाले, कोट्यवधींचा आयपीएल करार मिळाल्यानंतर परदेशी खेळाडूंचा सूर बदलले पाहायला मिळत आहे. ते आता भारतीयांप्रती मैत्रीचे संबंध ठेवत आहेत. काही वर्षांपूर्वी ब्लडी इंडियन्स म्हणणारे आज भारतीयांचे तळवे चाटत आहेत. आयपीएल सुरू झाल्यानंतर पैशांसाठी हे खेळाडू असं करत आहेत.पण, भारतीयांना त्यांचा खरा रंग माहित आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१इंग्लंडआॅस्ट्रेलिया