जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार?

इंग्लंडचे खेळाडू सध्या त्यांचे जूने ट्विट डिलीट करण्याच व्यग्र झाले असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 11:33 AM2021-06-09T11:33:16+5:302021-06-09T11:33:48+5:30

whatsapp join usJoin us
James Anderson deletes his ‘lesbian’ tweet from 2010, says ‘he is a changed person now’ | जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार?

जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचे खेळाडू सध्या त्यांचे जूने ट्विट डिलीट करण्याच व्यग्र झाले असतील. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सन  (Ollie Robinson) याच्यावर त्याच्या जुन्या ट्विटमुळे आयसीसीनं बंदीची कारवाई केली. त्यानंतर आणखी काही दिग्गज खेळाडू संकटात सापडण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात कर्णधार इयॉन मॉर्गन, जोस बटलर या आघाडीच्या खेळाडूंच्याही जुन्या ट्विटचा तपास सुरू झाला आहे. इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याचेही 2010 सालचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यानं सहकारी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड  (Stuart Broad)  याला लेस्बीयन असे म्हटले होते. त्याच्या या ट्विटची जोरदार चर्चा तेव्हा झाली, त्यानंतर त्यानं ते डिलिटही केलं. पण, आता रॉबिन्सन प्रकरणामुळे ते ट्विट पुन्हा व्हायरल झाले आहे आणि अँडरसनवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

अँडरसननं त्या ट्विटमध्ये ब्रॉड हा 15 वर्षांच्या लेस्बीयनसारखा दिसतो, असे म्हटले होते. त्यामुळे अँडरसनवर होमोफॉबिक ट्विट करण्याचा आरोप केला गेला आहे. त्यानं ट्विटमध्ये लिहिलं होतं की, मी ब्रॉडीचा नवा हेअरकट आज पहिल्यांदा पाहिला. त्याच्याबाबतीत मी काहीच खात्री देऊ शकत नाही. तो 15 वर्षाच्या लेस्बीयन सारखा दिसतोय.  ठरलं; राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी

 
अँडरसन आता काय म्हणाला?

हे ट्विट व्हायरल होताच अँडरसननं त्यावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, हे ट्वीट 10-11 वर्षांपूर्वीचे आहे आणि मी आता एक व्यक्ति म्हणून बदललो आहे. कालांतरानंतर व्यकितही बदल होतो. चुकांमधून तो शिकतो. अशा प्रकारच्या भाषेचा व शब्दांचा वापर खपवून घेतला जाणार नाही. 

ओली रॉबिन्सनचे ट्विट
१ ‘माझे नवे मुस्लिम मित्र बॉम्ब आहेत. (विशिष्ट धर्माच्या लोकांना दहशतवादी संबोधण्याचा प्रकार.)
२ ‘आशियाई लोक अशाप्रकारे हास्य करतात, याचे मला आश्चर्य वाटते!’ (विशेषत: चीनमधील लोकांच्या चहेऱ्यांबाबत भाष्य करीत मी स्वत: वर्णद्वेषी आहे, हे दाखवून दिले.)
३ रेल्वेत माझ्यासोबत जी व्यक्ती बसली आहे, त्याला निश्चितपणे इबोला झाला असावा’! (समाजात द्वेष पसरविणे आणि निकृष्ट ठरवून डिवचण्याचा प्रकार.)

भारतीय राष्ट्रगीताबद्दल डोम बेसचे वादग्रस्त ट्विट
२०१३ च्या चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान भारतीय संघाच्या राष्ट्रगीताबद्दल बेसच्या ट्विटर अकाउंटवरून वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते. शिवाय त्याने महेंद्रसिंह धोनीच्या बॅट बदलण्याच्या बाबतीतही विधान केल्याचे समोर आले. या व्हायरल झालेल्या ट्विटनंतर बेसने आपले ट्विटर अकाउंट बंद केले.
  

Web Title: James Anderson deletes his ‘lesbian’ tweet from 2010, says ‘he is a changed person now’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.