Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी वेगळे संघ हवे, टी-२० क्रिकेटला तज्ज्ञ खेळाडूंची गरज" अनिल कुंबळे यांचं मत

Anil Kumble : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झेप घेण्यासाठी कसोटी तसेच मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे संघ असावेत, असे मत माजी कर्णधार आणि कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 06:15 IST

Open in App

 नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झेप घेण्यासाठी कसोटी तसेच मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे संघ असावेत, असे मत माजी कर्णधार आणि कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. 

इंग्लंडने वन डे आणि टी-२० त यश मिळविल्याने पांढऱ्या आणि लाल चेंडूच्या खेळात वेगळे संघ ठेवण्याची चर्चा रंगत आहे.  या पार्श्वभूमीवर कुंबळे म्हणाले, ‘वेगळ्या प्रकारासाठी वेगळेच संघ हवे. टी-२० क्रिकेटला तज्ज्ञ खेळाडूंची गरज भासते. इंग्लंडने रविवारी आणि ऑस्ट्रेलियाने मागच्यावर्षी अधिक अष्टपैलू संघात हवेत, हे दाखवून दिले.’ 

लियॉम लिव्हिंगस्टोन हा सातव्या स्थानावर इंग्लंडसाठी फलंदाजी करतो. जगातील अन्य कुठल्याही संघाकडे त्याच्यासारखा खेळाडू नाही. ऑस्ट्रेलियासाठी स्टोइनिस सहाव्या स्थानावर खेळतो. आपल्यालादेखील अशा प्रकारची संघबांधणीे करावी लागेल.  वेगळा कर्णधार आणि वेगळे कोचही हवे, या मताशी मात्र मी सहमत नाही.  तुम्ही संघाची निवड कशी करता यावर हे समीकरण विसंबून असेल, असे कुंबळे यांनी नमूद केले.

वेगळे कोच असावेत‘वेगवेगळ्या संघांसाठी वेगळे कोच नेमण्यात यावेत, अशी सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मुडी यांनी केली. ‘हाच पुढे जाण्याचा मार्ग असल्याचे सांगून मुडी पुढे म्हणाले, ‘खेळाडू असो वा स्टाफ वेगळ्या संघासाठी वेगळी नेमणूक व्हायला हवी. यावर गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. त्यांनी इंग्लंडचे उदाहरण देत सांगितले की, इंग्लंडने कसोटीसाठी ब्रेंडन मॅक्युलमची, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी मॅथ्यू मोट यांची नेेमणूक  केली.’

टॅग्स :अनिल कुंबळेभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App