महान फलंदाज सचिन तेंडुलकर मंगळवारी वेगळ्याच भूमिकेत दिसला. देशातील लॉकडाऊन अजूनही कायम असल्यामुळे इतरांप्रमाणे सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनाही घराबाहेर पडता येत नाही. त्यात दुकानंही बंद असल्यामुळे सचिनला घरीच केस कापावी लागली. काही दिवसांपूर्वी त्यानं तो व्हिडीओ शेअर केला होता. सचिननं मंगळवारी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात तो मुलगा अर्जुनचे केस कापताना दिसत आहे. सचिननं अर्जुनचा मेकओव्हर केलेला पाहायला मिळत आहे.
Corona Virus : मुख्यमंत्र्यांचा एक फोन अन् दोन घासांसाठी झगडणाऱ्या धावपटूच्या मदतीला धावले शिवसैनिक
हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर सचिननं लिहिलं की,''बाप म्हणून सगळं यायला हवं. मुलांसोबत खेळणं असो, व्यायाम करणं असो किंवा त्यांचे केस कापणं असो.'' हेअर स्टायलिस्ट सचिनच्या मदतीला लेक साराही होती. ती सचिनला मार्गदर्शन करत असल्याचे तिच्या आवाजावरून कळत होतं.
पाहा व्हिडीओ...
Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्तकाही दिवसांपूर्वी सचिननं कन्या सारासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत सारानं एक स्पेशल डिश बनवली आहे आणि तेंडुलकरनं ती 60 सेकंदात फस्त केली. इंस्टाग्रामवर तेंडुलकरचे 21.7 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि सचिननं 60 सेकंदात ही डिश कशी फस्त केली, असा प्रश्न त्यांना पडला. तेंडुलकरनं एकट्यानं नव्हे, तर सारानंही त्याला मदत केली. सारानं ही डिश बनवली असल्यानं तेंडुलकरनं कौतुक केलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे!
प्रेक्षकांविना खेळणे म्हणजे, वधुशिवाय विवाह करणे; शोएब अख्तर
मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता; विराट कोहलीनं सांगितला थरारक प्रसंग
जगातील सर्वोत्तम खेळाडूला कन्यारत्न; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Hot and Beauty; 'या' टेनिसपटूसोबत डेटवर जाण्यासाठी चाहत्यानं मोजले चक्क 7 कोटी!