कॅचेस विन मॅचेस, हे का म्हटलं जातं याची प्रचिती वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून आली. वेस्ट इंडिजन तिसरा ट्वेंटी-२० सामना ६ विकेट्स राखून जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ड्वेन ब्राव्हो आणि फॅबिएन अॅलन या जोडीनं एक अफलातून झेल घेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याला माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १२व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा अफलातून झेल घेतला गेला. फिंचन टोलावलेला चेंडू टिपण्यासाठी ब्राव्हो व अॅलन यांना प्रयत्न करावे लागले.
RECORD ALERT! ख्रिस गेलनं रचला इतिहास; ११ चेंडूंत चोपल्या ५८ धावा, ट्वेंटी-२० पूर्ण केल्या १४,००० धावा!
ब्राव्होनं चेंडूचा झेल टिपला पण, त्याच्या हातून तो निसटला. पण, ब्राव्होनं चेंडूला किक मारली अन् नजिकच असलेल्या अॅलननं डाईव्ह मारून तो चेंडू टिपला.
पाहा व्हिडीओ...
ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४१ धावा केल्या. कर्णधार अॅरोन फिंच ( ३०), मोईजेस हेन्रीक्स ( ३३) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इथवर मजल मारली. हेडन वॉल्शनं दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात आंद्रे फ्लेचर ( ४) व लेंडल सिमन्स ( १५) हे झटपट माघारी गेल्यानंतर गेल व कर्णधार निकोलस पूरन यांनी ऑसी गोलंदाजांचा समाचार घेतला. गेलनं ७ षटकार व ४ चौकारांच्या मदतीनं ३८ चेंडूंत ६७ धावा केल्या. पूरन ३२ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजनं १४.५ षटकांत ४ बाद १४२ धावा करून विजय मिळवला. ( Chris Gayle storm helps West Indies register series clinching win over Australia)