Join us  

CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीने खेचलेला षटकार गेला स्टेडियम पार; पाहा तीन खणखणीत Six  

या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले.

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 8:00 AM

Open in App
ठळक मुद्देCSK vs RR या सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. शारजाहचे स्टेडियम लहान असल्याने प्रत्येकाने बॅटीवर चांगलाच हात आजमावला. या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले. महेंद्रसिंग धोनीनंही ( MS Dhoni) बॅटवर हात साफ करताना 3 खणखणीत षटकार खेचले. त्यापैकी एक षटकार थेट स्टेडियम बाहेर गेला. (  CSK vs RR Live Score & Updates  )

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या.  सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार  व  9 षटकारासह 74 धावा केल्या. स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या. एनगिडीनं अखेरच्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड ब़ॉलही टाकला. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या.

217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) आणि मुरली विजय ( Murali Vijay) यांनी CSKला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. राहुल टेवाटीयानं ही भागीदारी तोडली. त्यानं वॉटसनला त्रिफळाचीत केलं. वॉटसन 33 धावा ( 1 चौकार व 4 षटकार) करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस गोपाळनं 8व्या षटकात मुरली विजयला ( 21) बाद केलं. सॅम कुरन ( 17) आणि ऋतुराज गायकवाड ( 0) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही.  

धोनीनं सॅम कुरन, पदार्पणवीर ऋतुराज गायकवाड, केदार जाधव यांना पुढे खेळण्यास पाठवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. फॅफनं 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या.

पाहा धोनीच्या खणखणीत षटकारांचा व्हिडीओ...

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवर झाली चूक; टाय सामना नेमका कोणता?

रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ 

यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच 

SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video 

युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स