IPL 2020 : SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video

रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र ...

By स्वदेश घाणेकर | Published: September 22, 2020 05:03 PM2020-09-22T17:03:02+5:302020-09-22T17:04:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: 'A comeback and a half' - Virat Kohli, AB de Villiers celebrate RCB's 1st win in IPL 2020, Video | IPL 2020 : SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video

IPL 2020 : SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देदेवदत्त पडीक्कल व एबी डिव्हिलियर्सची अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा उभारता आल्याजॉनी बेअरस्टो खेळपट्टीवर असेपर्यंत सामना SRHच्या बाजूनं होता, पण चहलनं ट्विस्ट आणला

रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र चहलनं ट्विस्ट आणला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) खेळपट्टीवर असेपर्यंत सामना SRHच्या मुठीत होता, पण युजवेंद्रच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामन्याचे चित्रच बदलले. या विजयानंतर विराट कोहली ( Virat Kohli) & Teamने ड्रेसिंग रुममध्ये केलंलं सेलिब्रेशन पाहा.  ( Live Score & Updates 

IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

OMG : KKRच्या फलंदाजाची तुफान फटकेबाजी, कॅमेराची काचच फोडली; MIला धोक्याचा इशारा, Video

Munde baaro **** , लोकेश राहुलने वापरले अपशब्द; सोशल मीडियावर Video Viral

RCBकडून आयच्या सामन्यात IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक्कलनं ( Devdutt Padikkal) दमदार बॅटींग केली.  देवदत्तनं ( Padikkal) आरोन फिंच ( Aaron Finch) सारख्या अनुभवी फलंदाजासह RCBला दमदार सुरुवात करून दिली. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याने दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा उभारता आल्या.  ( Live Score & Updates 

IPL 2020 : युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली

लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचा कर्णधार व फॉर्मात असलेला फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. जॉनी बेअरस्टो ( Jonny  Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले.   ( Live Score & Updates 

SRHला नमवून विराट कोहलीचा विक्रम; महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्या मानाच्या पंक्तित जाऊन बसला!

तेथे सामना फिरला आणि शिवम दुबे व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर डेल स्टेननं एक विकेट घेत SRHचा डाव 19.4 षटकांत 153 धावांवर गुंडाळला. एकेकाळी 2 बाद 121 अशा मजबूत स्थितित असलेला SRHचा डाव 153 धावांवर गडगडला. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी पाठवले.   ( Live Score & Updates 

पाहा व्हिडीओ...

Web Title: IPL 2020: 'A comeback and a half' - Virat Kohli, AB de Villiers celebrate RCB's 1st win in IPL 2020, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.