CSK vs RR Latest News : Sanju Samson take Super Catch, CSK Kedar Jadhav out on 22, Watch Video | CSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

CSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोस बटलरच्या अनुपस्थितीत स्मिथनं सलामीला येण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आवडला. त्याला सॅमसनने जबरदस्त साथ दिली. पण, सॅमसन बाद झाल्यानंतर टप्प्याटप्य्यानं RRच्या विकेट्स पडल्या. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या.  (  CSK vs RR Live Score & Updates  )

महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण

RRचा कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत युवा फलंदाज यशस्वी जैस्वालनं सलामीला आला. त्याला तिसऱ्याच षटकात दीपक चहरने माघारी पाठवले. स्मिथ आणि संजू सॅमसन ( Sanju Samson ) यांनी RRचा डाव सावरला. सॅमसननं पीयूष चावला ( Piyush Chawla) याच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.  12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनचा झंझावात लुंगी एनगिडीनं रोखला. त्याच्या गोलंदाजीवर दीपक चहरनं झेल टिपला. सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार  व  9 षटकारासह 74 धावा केल्या. (  CSK vs RR Live Score & Updates  )

पाहा त्याचे षटकार...

त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेवीड मिलर ( David Miller) धावबाद झाला. रॉबीन उथप्पाही लगेच माघारी परतला. दरम्यान, स्मिथनंही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, RRचे विकेट पडण्याचे सत्र सुरू राहिले. राहुल टेवटीया व रियान पराग एकाच षटकात माघारी परतले. त्यामुळे RRच्या धावगतीला ब्रेक लागला. पण, स्मिथ खिंड लढवत होता. स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या. एनगिडीनं अखेरच्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड ब़ॉलही टाकला. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या. (  CSK vs RR Live Score & Updates  )

पाहा व्हिडीओ...
 
 
शेन वॉटसन-मुरली विजय यांची आश्वासक सुरुवात, पण...
217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) आणि मुरली विजय ( Murali Vijay) यांनी CSKला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी धावा जोडल्या. राहुल टेवाटीयानं ही भागीदारी तोडली. त्यानं वॉटसनला त्रिफळाचीत केलं. वॉटसन 33 धावा ( 1 चौकार व 4 षटकार) करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस गोपाळनं 8व्या षटकात मुरली विजयला ( 21) बाद केलं. सॅम कुरन ( 17) आणि ऋतुराज गायकवाड ( 0) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टीकता आले नाही. CSKच्या 10 षटकात 4 बाद 82 धावा झाल्या होत्या. (  CSK vs RR Live Score & Updates  )

जोफ्रा आर्चर फक्त ट्विट करत नाही, तर त्याची अंमलबजावणीही करतो; 2015चं ट्विट व्हायरल 

केदार जाधव ( Kedar Jadhav) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी 37 धावांची भागीदारी केली, परंतु टॉम कुरनच्या गोलंदाजीवर जाधव यष्टिंमागे संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. जाधवने 22 धावा केल्या. संजूनं सुपर कॅच घेत CSKला मोठा धक्का दिला. 

पाहा सुपर कॅच

अन्य महत्त्वाच्या बातम्या

चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवर झाली चूक; टाय सामना नेमका कोणता?

रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ 

यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच 

SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video 

युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs RR Latest News : Sanju Samson take Super Catch, CSK Kedar Jadhav out on 22, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.