भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat kohli) याला मागील दोन वर्षांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. नोव्हेंबर २०१९ पासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका सुरू आहे. अशात ऑस्ट्रेलियाचा पत्रकार निक सेव्हेजनं मागील दोन वर्षांतील कोहलीची आकडेवारी पोस्ट करून त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. पण, भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) याच्याकडून त्याला सडेतोड उत्तर मिळाले.
असेच ट्विट ऑस्ट्रेलियातील ७ क्रिकेट या न्यूज चॅनलनेही केलं. त्यात २०१९पासूनचा
विराट कोहलीची सरासरी ३१.१७ अशी दाखवून ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क याची ( ३८.६३) सरासरी अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यावरही जाफरनं उत्तर दिलं. त्यानं भारताचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी याची वन डे क्रिकेटमधील सरासरी व स्टीव्ह स्मिथची सरासरी याची तुलना केली. नवदीप सैनीची सरासरी ही ५३.५० अशी आहे, तर स्मिथची सरासरी ४३.३४ अशी आहे.
विराटला २०१९ ते २०२२ या कालावधीत ४५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३६.८६च्या सरासरीनं १८०६ धावा करता आल्या आहेत. त्यात १७ अर्धशतकांचा समावेश आहे.