Join us

वसीम अक्रमचा जुना फोटो पाहून पत्नीनं केलं ट्रोल; पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज म्हणाला, ती अंडरवेअर नाही!

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम ( Pakistan’s legendary cricketer Wasim Akram ) सध्या त्याच्या एका जुन्या फोटोमुळे चांगलाच चर्चेत आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:14 IST

Open in App

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम ( Pakistan’s legendary cricketer Wasim Akram ) सध्या त्याच्या एका जुन्या फोटोमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. १९८७साली पाकिस्तानच्या भारत दौऱ्यावरील तो फोटो आहे आणि त्यावेळी बंगळुरू येथील ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये ( Taj West End hotel ) दोन्ही संघांनी होळी साजरी केली होती. या फोटोत अक्रम उघडा पाहायला मिळत आहे आणि त्यानं शॉर्ट्स घातली आहे. त्याच्या शरीरावर रंग लागल्याचेही दिसत आहे. टीव्ही प्रेझेंटर गौतम भिमानी यानं हा फोटो शेअर करून, क्रिकेटपटूसोबत होळी खेळलेला फेव्हरीट क्षण, अशी कॅप्शन दिली आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कप फायनलमध्ये नेण्याची संधी माझ्याकडून हिसकावली गेली - शोएब अख्तरचं विधान 

वसीम अक्रम या फोटोवरून पत्नी शनिएरा अक्रम हिनं ट्रोलींग सुरू केलं. तिनं कमेंट केली की,''सकाळी ट्विटर ओपन केलं आणि नवऱ्याचा अंडरवेअरवरील फोटो पाहिला?; हे नॉरमल होतं का?;  Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल वसीमनंही त्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, तुझ्या माहितीसाठी सांगतो ती शॉर्ट्स आहेत. अंडरवेअर त्याच्या आत घालतात. 

पाकिस्ताननं १९८७मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौरा केला होता. पहिले चार सामने ड्रॉ राहिल्यानंतर पाकिस्ताननं अखेरची कसोटी १६ धावांनी जिंकून मालिका १-० अशी खिशात घातली होती.

टॅग्स :वसीम अक्रमभारत विरुद्ध पाकिस्तान