पाकिस्तानला वर्ल्ड कप फायनलमध्ये नेण्याची संधी माझ्याकडून हिसकावली गेली - शोएब अख्तरचं विधान 

भारतीय संघानं महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली २ एप्रिल २०११मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:37 PM2021-04-02T13:37:59+5:302021-04-02T13:38:24+5:30

whatsapp join usJoin us
'Denied an opportunity to take Pakistan to WC final' - Shoaib Akhtar on 10th anniversary of India-Pak marquee clash | पाकिस्तानला वर्ल्ड कप फायनलमध्ये नेण्याची संधी माझ्याकडून हिसकावली गेली - शोएब अख्तरचं विधान 

पाकिस्तानला वर्ल्ड कप फायनलमध्ये नेण्याची संधी माझ्याकडून हिसकावली गेली - शोएब अख्तरचं विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील धोनीचा तो विजयी षटकार आजही चाहत्यांच्या मनाच्या कोपऱ्यात ताजा आहे. आज त्याच ऐतिहासिक क्षणाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सोशल मीडियावर पुन्हा त्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं वादग्रस्त विधान केलं आहे. ( 'Denied an opportunity to take Pakistan to WC final' ) Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल

भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीत चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि त्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाची धुळ चाखवली. मोहाली येथे झालेल्या या सामन्यात शाहिद आफ्रिदीनं ( Shahid Afridi) अंतिम ११मध्ये शोएब अख्तरला संधी न दिल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अख्तर पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, अशा बातम्या त्यावेळी आल्या होत्या. तरीही त्याला तीन सामने खेळवण्यात आले आणि उपांत्य फेरीत तंदुरुस्तीच्या कारणानं बाकावर बसवले गेले. त्याच्या जागी वाहब रियाझला संधी मिळाली आणि त्यानं ४६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. पण, हा सामना खेळण्याची संधी न मिळाल्याची खंत आजही शोएबला वाटते. Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट; काही दिवसांपूर्वी झाला होता कोरोना

रावळपिंडी एक्स्प्रेसनं आज एक पोस्ट लिहिली. त्यानं ट्विट केलं की,''पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेण्याची संधी माझ्याकडून हिरावून घेतली गेली.''  महेंद्रसिंग धोनीचा खणखणीत षटकार, भावनिक झालेला सचिन तेंडुलकर अन् जगावर फडकला तिरंगा!


वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान पाचव्यांदा एकमेकांसमोर आले. भारतानं प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर (८५) याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ९ बाद २६० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत २३१ धावांवर गारद झाला. झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.   

Web Title: 'Denied an opportunity to take Pakistan to WC final' - Shoaib Akhtar on 10th anniversary of India-Pak marquee clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.