Join us

Wasim Akram Swimming Pool Viral Video: पाकिस्तानचा वासिम अक्रम थ्री-पीस सूट घालून स्विमिंग पूलमध्ये! कारण ऐकाल तर...

अक्रमने नक्की असं का केलं असावं... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 21:15 IST

Open in App

Wasim Akram Swimming Pool Viral Video: पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. अक्रमने सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो स्विमिंग पूलमध्ये थ्री-पीस सूट घालून पोहताना दिसला. पूलमध्ये जाताना बहुतेक लोक स्विंमिंग कॉस्टुम घालून जातात. पुरुष मंडळी सहसा शॉर्ट्स आणि सँडो घालतात, परंतु अक्रमने थ्री पीस सूट घातल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण वसीम अक्रमने यामागे एक मोठे कारण असल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी वसीम अक्रमने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तो स्विमिंग पूलच्या आत होता. खांद्यापर्यंत तो पाण्यात होता. तरीही काही लोकांनी त्याच्यावर शर्ट न घातल्याबद्दल टीका केली होती. त्यामुळे यावेळी अक्रमने अनोख्या पद्धतीने टीकाकारांची बोलती बंद केली. अक्रमने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लिहिले की, कदाचित मी गेल्या वर्षी पूलमध्ये पोहतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण, लोकांनी माझ्यावर शर्ट न घालण्यावर टीका केली होती. त्यामुळे आता त्या लोकांनी आनंदी राहावे कारण मी थ्री-पीस सूटमध्ये पोहत आहे. पाहा व्हिडीओ-

वसीम अक्रमची गणना पाकिस्तानच्या महान गोलंदाजांमध्ये केली जाते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वसीम अक्रम क्रिकेट विश्लेषक आणि समालोचक म्हणून भूमिका बजावताना दिसला. पाकिस्तानकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही अक्रमच्या नावावर आहे.

 

टॅग्स :वसीम अक्रमपाकिस्तानसोशल मीडियासोशल व्हायरल
Open in App