Aiden Markram आउट की नॉट आउट? Daryl Mitchell चा झेल अन् थर्ड अंपायरच्या निर्णयावर सगळेच शॉक (VIDEO)

थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर मार्करमच्या पत्नीसह सर्वच झाले शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 20:36 IST2026-03-04T20:34:55+5:302026-03-04T20:36:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Was Aiden Markram really out? Daryl Mitchell’s Diving Catch Sparks Debate In SA vs NZ T20 World Cup Semi Final Watch Video | Aiden Markram आउट की नॉट आउट? Daryl Mitchell चा झेल अन् थर्ड अंपायरच्या निर्णयावर सगळेच शॉक (VIDEO)

Aiden Markram आउट की नॉट आउट? Daryl Mitchell चा झेल अन् थर्ड अंपायरच्या निर्णयावर सगळेच शॉक (VIDEO)

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडण्याचा डाव अगदी यशस्वी साधला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याचा झेल वादग्रस्त ठरत आहे. 

थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर मार्करमच्या पत्नीसह सर्वच झाले शॉक


 
दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या ८ व्या षटकात रचिन रवींद्र गोलंदाजी करत होता. मार्करम याने मारलेला फ्लॅट फटका लॉन्ग-ऑनच्या दिशेने गेला. डॅरिल मिचेल याने अप्रतिमरित्या झेल टिपण्याचा प्रयत्न केला. त्यालाही हा झेल झाला की नाही त्याबाबत शंका होती. पण तिसऱ्या पंचाला तसे वाटले नाही. फार वेळ न घेता तिसऱ्या पंचांनी एडन मार्करम आउट असल्याचा निर्णय दिला. यावरुन सोशल मीडियावर तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर शंका उपस्थितीत करण्यात येत आहेत. तिसऱ्या पंचांनी मार्करमला आउट असल्याचा निर्णय दिल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची पत्नी निकोल डॅनियलसह तिच्यासोबत असणाऱ्या साऱ्याजणी आवाक् झाल्याचे पाहायला मिळाले.  

IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO

पंचांनी कोणत्या आधारावर दिली ही विकेट?
 
मैदानावरील पंच अ‍ॅलेक्स व्हार्फने कॅच दरम्यान चेंडू जमिनीला स्पर्श केला आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिसरे पंच नितीन मेनन यांची मदत घेतली. सुरुवातीला फ्रंट-अँगल रिप्लेमुळे कॅच संशयास्पद वाटला, ज्यामुळे मिशेलच्या डायव्ह दरम्यान चेंडू कदाचित मैदानावर आदळला असावा असे दिसून आले. तथापि, जेव्हा साईड-ऑन रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा असे दिसून आले की, मिशेलने चेंडू जमिनीवर येण्यापूर्वीच त्याचे बोटे खाली ठेवण्यात यश मिळवले होते. उपलब्ध अँगल पाहिल्यानंतर, थर्ड अंपायर नितीन मेनन साइड-ऑन पुराव्यांवर समाधानी झाले आणि त्यांनी कॅच क्लीन ठरवला आणि मार्करामला तंबूचा रस्ता धरावा लागला. मार्करम याने २० चेंडूत १८ धावा केल्या. यात त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला.

 

Web Title : एडेन मार्कराम का आउट विवादों में, दक्षिण अफ्रीका बनाम न्यूजीलैंड मैच।

Web Summary : दक्षिण अफ्रीका-न्यूजीलैंड टी20 विश्व कप मैच में एडेन मार्कराम के विवादास्पद आउट ने बहस छेड़ दी। थर्ड अंपायर के फैसले से मार्कराम की पत्नी और प्रशंसक हैरान रह गए। रिप्ले में संभावित रूप से गेंद जमीन को छूती दिखी, लेकिन अंपायर ने आउट करार दिया, जिससे सोशल मीडिया पर आलोचना हुई।

Web Title : Aiden Markram's dismissal sparks controversy in South Africa vs. New Zealand match.

Web Summary : Aiden Markram's controversial dismissal in the South Africa-New Zealand T20 World Cup match ignited debate. Third umpire's decision shocked Markram's wife and fans. Replays suggested possible ground contact, but the umpire ruled him out, leading to social media criticism.