'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!'

कसोटीत दोन त्रिशतक करणारा एकमेव भारतीय आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:01 PM2020-05-09T15:01:10+5:302020-05-09T15:02:16+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag Would Have Scored 10,000 Runs if He Played for Other Team, Rashid Latif svg | 'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!'

'Virender Sehwag दुसऱ्या संघाकडून खेळला असता, तर हमखास 10 हजार धावा केल्या असत्या!'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातील क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आक्रमक फलंदाज म्हणून आजही भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ओळखला जातो. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 7500 हजार धावा करणारा तो एकमेव सलामीवीर आहे. पण, सेहवाग भारत सोडून अन्य संघाकडून खेळला असता तर त्यानं 10 हजार धावांचा पल्ला नक्की ओलांडला असता. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या प्रसिद्धीमागे तो झाकोळला गेला, असं मत पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफनं व्यक्त केलं आहे.

नवाब ऑफ नजफगड म्हणून वीरू ओळखला जातो आणि लतिफनं यावेळी त्याचं कौतुक केलं. तो म्हणाला,''आक्रमक खेळ करणं, त्याला आवडायचे. विकेट वाचवून खेळणारा आणि खेळपट्टीचा अभ्यास करणारा फलंदाज सलामीला पाहण्याची आपल्याला सवय झाली होती. पण, सेहवाग कोणत्याच गोलंदाजाला घाबरत नसायचा. प्रचंड प्रतिभा असलेला खेळाडू आणि त्याचा संघावर प्रभाव दिसायचा.''

''सेहवागचे विक्रमच त्याच्याबद्दल बरंच काही सांगतात. कसोटीत 8 हजार धावा त्याच्या नावावर आहेत. पण, तो नेहमीच सचिन आणि द्रविड यांच्या सावलीखाली राहिला. तो दुसऱ्या देशाकडून खेळला असता तर त्यानं नक्कीच 10 हजार धावांचा पल्ला ओलांडला असता,''असेही लतिफ म्हणाला. 

सेहवागच्या फलंदाजीच्या तंत्राबद्दल लतिफने सांगितले की,''त्यात योग्य पदलालित्य नव्हते, असे म्हणणे चुकीचे आहे. फलंदाजी करण्याची त्याची स्वतःची वेगळी शैली होती. बॅकफूटवर तो दमदार खेळ करायचा.''

सेहवागनं 104 कसोटी सामन्यांत 8586 आणि 251 वन डे सामन्यांत 8273 धावा केल्या आहेत. त्याशिवाय कसोटीत दोन त्रिशतक करणारा एकमेव भारतीय आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!

अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!

Corona Virus : Shah Rukh Khanचा संघ करतोय परदेशात गरजूंना मदत 

Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत

कोरोना व्हायरसचा फटका; क्रिकेटपटूवर तंबूतच राहण्याची वेळ

Shocking : ...म्हणून पंजाब पोलिसानं झाडली गोळी, 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

Mohammed Shamiच्या पत्नीनं ट्रोलर्सना सुनावलं; तीन व्हिडीओ शेअर करत घेतला समाचार 

Web Title: Virender Sehwag Would Have Scored 10,000 Runs if He Played for Other Team, Rashid Latif svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.