Virender Sehwag : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो पोस्ट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतो, तुम्ही घाबरू नका 

Virender Sehwag इंडियन लिजंड्स ( India Legends) संघानं वेस्ट इंडिज लिजंड्स ( West Indies Legends) संघावर १२ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:59 PM2021-03-18T15:59:32+5:302021-03-18T15:59:57+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag Takes Subtle Crack At Imran Khan As India Legends Beat West Indies At RSWS | Virender Sehwag : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो पोस्ट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतो, तुम्ही घाबरू नका 

Virender Sehwag : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो पोस्ट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतो, तुम्ही घाबरू नका 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (  Road Safety World Series) उपांत्य फेरीच्या सामन्यात ९ विकेट्स पडल्या, ४० षटकांत तब्बल ४२४ धावा चोपल्या गेल्या आणि २१ षटकार व ३६ चौकारांची आतषबाजी झाली. हा सामना इतका रोमहर्षक झाला की अखेरच्या षटकापर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. पण, भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत दमदार खेळ करताना विजय खेचून आणला.  या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) एक पोस्ट केली आणि त्यात त्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी क्रिकेटपटू इम्रान खान ( Imram Khan) यांच्या फोटोची मदत घेतली. जसप्रीत बुमराहला खराब कामगिरीनंतरही जाब विचारला जात नाही; मोहम्मद आमीरनं अंतर्गत वादात भारतीय गोलंदाजाला खेचले!

१७ मार्चला हा सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघाला ५६ धावांची सलामी दिली. वीरू १७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ३५ धावांत माघारी परतला. सचिन तेंडुलकरनं ४२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. यूसूफ पठाणनं २० चेंडूंत ३७ धावा कुटल्या. युवराजची बॅट पुन्हा तळपली आणि त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारासह नाबाद ४९ धावा चोपल्या आणि भारतीय संघानं २० षटकांत ३ बाद २१८ धावांचा डोंगर उभा केला. Sachin Tendulkar : सचिनचे अर्धशतक, युवराजची आतषबाजी; लाराची वादळी खेळी अन् ४० षटकांत ४२४ धावा

वेस्ट इंडिजकडून सडेतोड उत्तर मिळाले. ड्वेन स्मिथनं ३६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६३ धावा, तर नरसिंग देवनरीननं ४४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या. कर्णधार ब्रायन लारानं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची वादळी खेळी केली. पण, विंडीज संघाला ६ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारता आली. 
या सामन्यातील रोमहर्षकता सांगण्यासाठी वीरूनं पोस्ट केली. त्यानं इम्रान खानचा फोटो पोस्ट केला आणि त्यावर लिहिले की,''अखेरपर्यंत धाकधुक लागली होती, पण तुम्ही घाबरू नका.'' इरफान पठाणकडून आतापर्यंतची सगळ्यात वाईट गोलंदाजी, मग सचिननं दिला कानमंत्र अन् बनला 'मॅच विनर'

Web Title: Virender Sehwag Takes Subtle Crack At Imran Khan As India Legends Beat West Indies At RSWS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.