जसप्रीत बुमराहला खराब कामगिरीनंतरही जाब विचारला जात नाही; मोहम्मद आमीरनं अंतर्गत वादात भारतीय गोलंदाजाला खेचले!

Mohammad Amir on lack of support from Pakistan management पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर ( Mohammad Amir) यानं गतवर्षी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:35 PM2021-03-18T15:35:20+5:302021-03-18T15:35:46+5:30

whatsapp join usJoin us
‘Nobody questioned Jasprit Bumrah while he couldn’t perform’ – Mohammad Amir on lack of support from Pakistan management | जसप्रीत बुमराहला खराब कामगिरीनंतरही जाब विचारला जात नाही; मोहम्मद आमीरनं अंतर्गत वादात भारतीय गोलंदाजाला खेचले!

जसप्रीत बुमराहला खराब कामगिरीनंतरही जाब विचारला जात नाही; मोहम्मद आमीरनं अंतर्गत वादात भारतीय गोलंदाजाला खेचले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर ( Mohammad Amir) यानं गतवर्षी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत जगाला आश्चर्याचा धक्का दिला. निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना आमीरनं पाकिस्तान क्रिकेट मंडळातील ( PCB) गटबाजी आणि संघ व्यवस्थापनाकडून मिळत असलेल्या वागणुकीवर टीका केली होती. पण, त्यानंतर त्यानं संघ व्यवस्थापनासोबत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करताना त्यांच्याकडून हवी तशी मदत मिळाली नाही, असे स्पष्टीकरण दिले. आता या वादात त्यानं भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला खेचले आहे. जसप्रीत बुमराहकडून खराब कामगिरी झाली, तरी त्याला जाब विचारला जात नाही. संघ व्यवस्थापन त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहते, असे आमीर म्हणाला. ( Nobody questioned Jasprit Bumrah while he couldn’t perform)

जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा प्रमुख जलदगती गोलंदाज आहे. त्यानं भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ऑस्ट्रओेलिया दौऱ्यावर जसप्रीतला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, याची आठवण आमीरनं करून दिली. त्यावेळी बुमराहच्या क्षमतेवर कुणीच प्रश्न उपस्थित केला नाही आणि त्याला तेव्हाही संघाकडून पाठिंबा मिळाला होता, असेही आमीर म्हणाला. Sachin Tendulkar : सचिनचे अर्धशतक, युवराजची आतषबाजी; लाराची वादळी खेळी अन् ४० षटकांत ४२४ धावा

तो म्हणाला,''चार-पाच सामन्यांच्या कामगिरीवरून खेळाडूची क्षमता पारखणे, ही चुकीचे आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर १६ सामन्यांत फक्त १ विकेट घेतली होती, परंतु त्याच्यावर क्षमतेवर कुणी सवाल केला नाही. तो मॅच विनर गोलंदाज आहे. त्याहीवेळेस संघ व्यवस्थापन त्याच्या मागे खंबीरपणे उभे होते.'' 

पण, पाकिस्तान संघ व्यवस्थापन असं करत नाही. तो म्हणाला,''खेळाडू जेव्हा चांगली कामगिरी करत नाही तेव्हा मदत करण्याचं काम संघ व्यवस्थापनाचं आहे. त्याला संघातून वगळण्याचं काम नाही. असंच होत राहिलं, तर तुम्हाला प्रत्येक खेळाडू हा ख्रिस्तियानो रोनाल्डो सारखाच देऊ. मग तुम्ही फक्त बसून मॅचचा आनंद घ्या आणि काहीच करू नका.'' 

Web Title: ‘Nobody questioned Jasprit Bumrah while he couldn’t perform’ – Mohammad Amir on lack of support from Pakistan management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.