Join us

रोहितकडे कॅप्टन्सी देण्याचा विराटने विचार करावा- शोएब अख्तर

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने नुकतंच आयपीएलचं पाचवं जेतेपद आपल्या नावावर केलं. मुंबई इंडियन्सच्या या ऐतिहासिक विजयानंतर सध्याच्या भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या विभाजनाची चर्चा सुरु झाली. 

By मोरेश्वर येरम | Updated: November 19, 2020 15:11 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद रोहितकडे द्यावं, शोएब अख्तरचं मतविराटच्या अनुपस्थित कर्णधारपदासाठी रोहित सर्वोत्तम पर्याय कर्णधारपदासाठी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रोहितला नामी संधी

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत मोठं विधान केलं आहे. विराट कोहलीने भारतीय टी-२० संघाचे संघाने कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्याबाबत विचार करायला हवा, असं मत शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने नुकतंच आयपीएलचं पाचवं जेतेपद आपल्या नावावर केलं. मुंबई इंडियन्सच्या या ऐतिहासिक विजयानंतर सध्याच्या भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या विभाजनाची चर्चा सुरु झाली. 

'ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही रोहित शर्माची अतिशय महत्वाची असेल,  या मालिकेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी रोहितला स्वत:ला सिद्ध करता येईल. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा अतिशय उत्तमरित्या भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो', असं शोएब अख्तर म्हणाला. 

टॅग्स :रोहित शर्माशोएब अख्तरविराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामुंबई इंडियन्स