Join us

Virat Kohli Record Against Leg-Spin : लेग स्पिनरसमोर कोहलीची 'विराट' जादू 'गायब'

रिशाद हुसेन यानं परफेक्ट सेटअपसह विराटला दिला चकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 20:54 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अर्धशतकी खेळीसह विराट कोहलीनं फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याची विराट जादू काही दिसली नाही. बाहेरच्या चेंडूवर फसणाऱ्या विराट कोहलीला बांगलादेशच्या फिरकीपटूनं अगदी परफेक्ट सेटअपसह किंग कोहलीला तंबूचा रस्ता दाखवल्याचे पाहायला मिळाले. कॅप्टन रोहित शर्माची विकेट पडल्यावर विराट कोहली मैदानात आला. तो या सामन्यात ३७ धावा करून १४ हजार धावांचा खास विक्रम आपल्या नावे करेल, अशी आशा होती. पण रिशाद हुसेन (Rishad Hossain) याने कमालीची गोलंदाजी करत कोहलीला अवघ्या २२ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

किंग कोहली सोपा झेल देऊन स्वस्तात परतला तंबूत

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं ३८ चेंडूचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. आपल्या या डावातील पहिला चौकार मारण्याआधी त्याने ३५ चेंडू खेळले. अगदी संयमीरित्या आपली खेळी बहरताना दिसला. पण रिशाद हुसेन घेऊन आलेल्या भारताच्या डावातील २३ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑफ साइडला फटका मारण्याच्या नादात त्याने पॉइंटवर उभ्या असलेल्या फिल्डरच्या हाती अगदी सोपा झेल दिला. 

रिशाद हुसेन यानं परफेक्ट सेटअपसह विराटला दिला चकवा

लेग स्पिनर रिशाद हुसेन याने क्रिकेट जगतातील स्टार फलंदाजासमोर अगदी चतुराईनं गोलंदाजी केली. आधी त्याने ऑफ स्टंपवर चेंडू टाकून तो बाहेर काढला. गेल्या काही दिवसांपासून कोहली बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसताना पाहायला मिळाले आहे. या चेंडूसह बांगलादेश फिरकीपटूनं किंग कोहलीच्या मनात एक संभ्रम निर्माण केला. मग सरळ चेंडू टाकला अन् विराट ऑफच्या दिशेनं फटका मारताना त्याच्या जाळ्यात फसला. 

लेग स्पिनर विरुद्ध किंग कोहलीची आकडेवारी थक्क करून सोडणारी

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ५ डावात विराट कोहली पाचव्यांदा लेग स्पिनरच्या जाळ्यात फसल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत तो आदिल राशीदच्या गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसले होते. आता बांगलादेश विरुद्ध रिशाद हुसेन याने त्याला फसवले. विराट खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीनं मागील पाच डावात लेग स्पिनरच्या विरुद्ध ५१ चेंडूचा सामना करताना ६.२० च्या सरासरीनं फक्त ३१ धावा काढल्या आहेत. यात पाच वेळा त्याने विकेट फेकली आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध बांगलादेशचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५