कोहली - माल्ल्याच्या फोटोवरून सोशल मीडियावर कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 19:30 IST2018-07-28T19:18:03+5:302018-07-28T19:30:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli's picture with Vijay Mallya's goes viral | कोहली - माल्ल्याच्या फोटोवरून सोशल मीडियावर कल्ला

कोहली - माल्ल्याच्या फोटोवरून सोशल मीडियावर कल्ला

मुंबई - एसेक्स क्लबविरूद्धचा सराव सामना भारतीय क्रिकेटपटूंसाठी संमिश्र राहिला. तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारतीयांनी खो-याने धावा केल्या, विकेट्सही घेतल्या. त्यासह त्यांच्या वाट्याला अपयशही आले. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव लढतीत आपल्या कामगिरीची चाचपणी केली. 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. मात्र, एसेक्सविरूद्घच्या सामन्यानंतर विराट कोहलीने काढलेला फोटो वेगळ्याच कारणाने व्हायरल होत आहे. या फोटोत असणारी व्यक्ती विजय माल्ल्यासारखी दिसत असल्याने सोशल मीडियावर कल्ला सुरू आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोत कोहलीने मल्ल्यासारख्या दिसणा-या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्यामुळे फॉलोअर्सकडून टीका होऊ लागली, तर काहींनी विनोद केले. 


 

Web Title: Virat Kohli's picture with Vijay Mallya's goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.