Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिरुरच्या मतदारसंघामध्ये झाली होती विराट कोहलीची एंट्री; जाणून घ्या वायरल सत्य...

सारेच कोहलीची आतुरतेने वाट पाहत होते. कोहली आला... कोहली आला..., अशी चर्चा सुरु झाली. दाढी असलेला, गॉगल घातलेला कोहली दाखल झाला, अशी चर्चा सुरु झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:16 IST

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला निवडणूकीचे वारे महाराष्ट्रामध्ये जोरदार वाहू लागले आहेत. सध्याच्या घडीला वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकृष्ठ करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती करत आहेत. काही उमेदवार मोफत गोष्टी वाटत आहेत तर काही उमेदवार सेलिब्रेटींना आपल्या रॅलीमध्ये आणताना दिसत आहेत. पण शिरुरच्या मतदार संघामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीची एंट्री झाल्याची चर्चा चांगलीच रंगत होती.

सध्याच्या घडीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. हा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पण भारताचा संघ पुण्यामध्ये सोमवारीच दाखल झाला होता.

शिरुरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक आहे. पण शिरुरमध्ये 2018 साली ग्राम पंचायतीची निवडणूक होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोहली शिरुरमध्ये येणार, असे म्हटले जात होते. ही रॅली 25 मे रोजी होणार होती. सारेच कोहलीची आतुरतेने वाट पाहत होते. कोहली आला... कोहली आला..., अशी चर्चा सुरु झाली. दाढी असलेला, गॉगल घातलेला कोहली दाखल झाला, अशी चर्चा सुरु झाली. पण जेव्हा काही जणं त्याच्या जवळ आले तेव्हा त्यांना शंका यायला लागली की, हा नेमका कोहलीच आहे का? रॅली झाली आणि त्यानंतर समजले की, हा कोहलीसारखा दिसणारा व्यक्ती त्याचा ड्युपलिकेट सौरभ गाडे होता.

टॅग्स :विराट कोहलीशिरुर