भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं जानेवारी २०२१मध्ये मुलगी झाल्याची गोड बातमी दिली आणि २०२१ वर्षात भारतात सर्वाधिक पसंतीचं ट्विट ठरलं. ट्विट इंडियानं २०२१मधील सर्वाधिक पसंतीचे, रिट्विट केलेल्या ट्विटची घोषणा केली. उद्योगपती, क्रीडा, मनोरंजन, आदी कॅटेगरीतील सर्वाधिक पसंतीच्या ट्विटमध्ये विराटच्या गोड बातमीनं बाजी मारली आहे. १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान भारतातील ट्विटर अकाऊंट्सच्या रिट्विट्स/लाइक्सच्या आकडेवारीची घोषणा झाली.
विराट कोहलीनं मुलगी झाल्याची गोड बातमी ट्विट केली होती आणि त्याला सर्वाधिक ५ लाख ३९,७७१ लाईक्स व ५०८७७ रिट्विट्स मिळाले. भारतातील हे सर्वाधिक लाईक्स मिळालेले ट्विट ठरले.
कोरोना संकटात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स यानं भारताला मदत करण्याचे आवाहन जगाला केलं होतं. त्या ट्विटला सर्वाधिकरिट्विट्स मिळाले. कमिन्सचं हे ट्विट ४ लाख ८८ हजार लोकांनी लाईक्स केले आणि १ लाख १४, ३६० रिट्विस्ट मिळाले.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील गॅबामधील ऐतिहासिक विजयाचे कौतुक केलं होतं त्या ट्विटलाही Government कॅटेगरीत सर्वाधिक लाईक्स मिळाले.