विराट कोहलीने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू

Virat Kohli Instagram Record | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 04:41 PM2023-05-25T16:41:39+5:302023-05-25T16:43:19+5:30

whatsapp join usJoin us
virat kohli world record 1st asian completes 250 million followers on instagram | विराट कोहलीने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू

विराट कोहलीने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Instagram World Record | टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली मैदानासोबतच सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवतो. विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक पराक्रम केले आहेत. तो सतत मोठे विक्रम आपल्या नावावर करत राहतो. पुन्हा एकदा विराट कोहलीने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे, मात्र यावेळी त्याने हा पराक्रम मैदानावर नाही तर सोशल मीडियावर केला आहे.

विराटने केला विश्वविक्रम

विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या 250 मिलियनच्या पुढे गेली आहे. विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट आता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अकाऊंट बनले आहे. त्यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरच आहेत.

तसेच, स्पोर्ट्समध्ये, क्रिस्टियानो रोनाल्डो 585 दशलक्ष फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवर आघाडीवर आहे, तर लिओनेल मेस्सी 462 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर विराट कोहली 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा पहिला भारतीय देखील आहे.

विराट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून करतो करोडोंची कमाई

हूपरच्या 2022 च्या इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराटला प्रायोजित पोस्टमधून सुमारे 8.69 कोटी रुपये मिळतात. इंस्टाग्रामवरून कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली 14 व्या क्रमांकावर आहे. फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 15 कोटी रुपये घेतात. विराट कोहलीचे ट्विटर अकाऊंटवर 50 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. केवळ पीएमओचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटचे भारतात जास्त फॉलोअर्स आहेत.

IPL 2023मध्ये जिंकली चाहत्यांची मने

IPL 2023 मध्ये विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने 14 सामन्यांमध्ये 639 धावा केल्या आहेत. त्याचवेळी आयपीएलपूर्वी कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावून कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळही संपवला होता. विराट कोहली आता WTC फायनलसाठी लंडनला पोहोचला आहे. तेथेही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Web Title: virat kohli world record 1st asian completes 250 million followers on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.