Join us

विराट डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धोनीचा विक्रम मोडणार, विजयासह लॉयडला पिछाडीवर सोडण्याची संधी

WTC final News: कोहलीने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे आणि तो महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 07:49 IST

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मैदानावर उतरल्यानंतर सर्वाधिक कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व करणारा कर्णधार ठरेल आणि या लढतीत विजय मिळविला तर जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर येईल.कोहलीने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे आणि तो महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीत आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये १८ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये उतरल्यानंतर भारतातर्फे सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर नोंदविल्या जाईल.कोहलीला यंदा सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान हा विक्रम नोंदवण्याची संधी होती, पण तो त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या तीन कसोटी सामन्यांत खेळू शकला नव्हता. २०१४ मध्ये प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीने आतापर्यंत ६० सामन्यांत भारताचे कर्णधारपद भूषविले असून त्यात ३६ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. हा भारतीय विक्रम आहे. धोनी ६० सामन्यांत २७ विजयासह दुसऱ्या स्थानी आहे.लॉयडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने ७४ सामने खेळले त्यात ३६ सामन्यांत विजय मिळवला होता. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यांत विजय मिळविण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ (१०९ सामन्यांत ५३ विजय) याच्या नावावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (७७ सामने, ४८ विजय) आणि स्टीव्ह वॉ (५७ सामने, ४१ विजय) यांचा क्रमांक येतो.  ग्रॅमी स्मिथच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामन्यांत कर्णधारपद भूषविण्याचा विक्रमही आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा एलन बॉर्डर (९३ सामने) न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (८०), पॉन्टिंग (७७), लॉय़ ड   (७४), धोनी व कोहली यांचा क्रमांक येतो.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी