Join us

'या' गोलंदाजाला घाबरायचा विराट कोहली; वाटलं होतं आता करीअर संपलं...

कोहली हा वेस्ट इंडिजच्या एका गोलंदाजाला घाबरायचा. आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांनी  'या' गोलंदाजाबद्दल सांगितले होते आणि तो आपली कारकिर्द संपुष्टात आणू शकतो, असे कोहलीला वाटत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:09 IST

Open in App
ठळक मुद्देवेस्ट इंडिजच्या एका वेगवान गोलंदाजाने कोहलीला दोन कसोटी सामन्यांमध्ये तब्बल तीन वेळा बाद केले होते.

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक विराट कोहली असल्याचे म्हटले जात आहे. पण एक काळ असा होता की, तो एका गोलंदाजाला घाबरायचा. त्या एका गोलंदाजाचा त्याने एवढा धसका घेतला होता की, आपली कारकिर्द आता संपुष्टात येऊ शकते, अशी भितीही कोहलीला वाटत होती.

एका वरिष्ठ क्रीडा पत्रकारांनी एक पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकामध्ये एक किस्सा लिहिला आहे. त्यानुसार कोहली हा वेस्ट इंडिजच्या एका गोलंदाजाला घाबरायचा. आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांनी  'या' गोलंदाजाबद्दल सांगितले होते आणि तो आपली कारकिर्द संपुष्टात आणू शकतो, असे कोहलीला वाटत होते.

वेस्ट इंडिजच्या एका वेगवान गोलंदाजाने कोहलीला दोन कसोटी सामन्यांमध्ये तब्बल तीन वेळा बाद केले होते. या गोलंदाजाचा सामना नेमका कसा करायचा, हे कोहलीला समजत नव्हते. पण त्यानंतर हा गोलंदाज वेस्ट इंडिजच्या संघाच जास्त काळ दिसला नाही. हा वेगवान गोलंदाज होता फिडेल एडवर्ड्स.

टॅग्स :विराट कोहलीभारतवेस्ट इंडिज