Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली... भाभीजी कहा हैं; चाहत्यांनी केले ट्रोल

त्या फोटोनंतर कोहली ट्रोल व्हायला लागला आणि चाहत्यांना कोहलीला विचारायला सुरुवात केली, "भाभीजी कहा हैं. "

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:10 IST

Open in App
ठळक मुद्देत्यामुळेच विराटने आपल्या आईसह, बहिण आणि त्यांच्या मुलांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यांच्याबरोबरचे एक छायाचित्र कोहलीने इंस्टाग्रामवर टाकले आहे.

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून चार हात लांब आहे. सध्याच्या घडीला तो आपल्या कुटुंबियांना जास्त वेळ देत आहे. आपल्या कुटुंबियांबरोबर एक फोटो कोहलीने इंस्टाग्रामवर टाकला. पण त्या फोटोनंतर कोहली ट्रोल व्हायला लागाला आणि चाहत्यांना कोहलीला विचारायला सुरुवात केली, "भाभीजी कहा हैं. "

सध्या कोणतीही क्रिकेट स्पर्धा नाही. आयपीएलमध्ये कोहलीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला आपला वेळ कुटुंबियांसह व्यतित करण्याचे कोहलीने ठरवले. त्यामुळेच त्याने आपल्या आईसह, बहिण आणि त्यांच्या मुलांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यांच्याबरोबरचे एक छायाचित्र कोहलीने इंस्टाग्रामवर टाकले आहे. पण या फोटोमध्ये अनुष्का दिसत नसल्याने त्याबद्दल लोकांनी कोहलीला प्रश्न विचारून भांडावून सोडले आहे.

कोहलीच्या या फोटोवर एका चाहत्याने विचारले आहे की, या फोटोमध्ये अनुष्का कुठेच दिसत नाही, ती कुठे आहे? गाडी चालवत आहे का? त्यावर एका चाहत्याने अनुष्का अमेरिकेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला विराट ट्रोल होताना दिसत आहे.

टॅग्स :विराट कोहलीइन्स्टाग्रामक्रिकेटअनुष्का शर्माविरूष्का