डुब्लिन - भारतीय क्रिकेट संघाने आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार विजयी सलामी दिली. या लढतीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी विश्रांतीच्या दिवशी सहका-यांसह डुब्लिनमध्ये फेरफटका मारला. त्याचे फोटो विराटने आपल्या व्टिटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये विराटसह अष्टपैलू हार्दिक पंड्या, सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल दिसत आहेत. भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरी लढत शुक्रवारी होणार आहे.