कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. क्रिकेट स्पर्धा होत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी मजेशीर आकडेवारी पोस्ट केली. त्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टॉप असल्याचे दिसत आहे.
आयसीसीनं जानेवारी 2017पासून ते आतापर्यंत नॉन-विकेटकिपर खेळाडूंमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंची लिस्ट पोस्ट केली. त्यात विराट अव्वल स्थानावर विराजमान असल्याचे दिसत आहे. आयसीसीनं या आकडेवारीत टॉप फाईव्ह खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यात कोहली 95 झेलसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंडचा फलंदाज जो रूट 94 झेलसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीस आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स अनुक्रमे 85 व 80 झेलसह तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस 78 झेलसह पाचव्या क्रमांकावर आहे.
रविवारी आयसीसीऩं जानेवारी 2017पासून ते आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या पाच फलंदाजांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यातही कोहली टॉपवर होता. कोहलीच्या खात्यात 8465 धावा आहेत. त्यानंतर रोहित शर्मा ( 6350), जो रूट ( 6203), बाबर आझम ( 5387) आणि रॉस टेलर ( 4801) यांचा क्रमांक येतो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा
शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न