Join us

कर्णधारपद जाणार असे कळताच विराट कोहलीने उचलले मोठे पाऊल

आपले कर्णधारपद वाचवण्यासाठी कोहलीने मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 16:48 IST

Open in App

मुंबई : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला. या पराभवाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. आपले कर्णधारपद जाणार, अशी कुणकुण आता विराट कोहलीला लागली आहे. त्यामुळे आपले कर्णधारपद वाचवण्यासाठी कोहलीने मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

विश्वचषक स्पर्धेतील पराभव, संघातील गटबाजीच्या बातम्या, या पार्श्वभूमीवर आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी व कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून सुरू आहे. बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना तसे स्पष्ट संकेत दिले. ‘पुढील स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करून भारत तयारीला लागेल. त्यासाठी रोहितकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो नेतृत्व करू शकतो, तर कोहलीकडे कसोटी संघाची धुरा कायम ठेवली जाऊ शकते,’ असे पदाधिका-याने सांगितले.

विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी कोहली आणि बुमरा यांनी विश्रांती घ्यायची ठरवली होती. पण आता आपले कर्णधारपद जाऊ शकते, हे कळल्यावर मात्र कोहलीने वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्त 'जागरण' या संकेतस्थळाने दिले आहे.

आयसीसीच्या संघात विराटला स्थान नाहीविश्वचषकाची अंतिम फेरी झाल्यानंतर आयसीसीच्या वतीने या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा एक संघ बनविला जातो. या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले नाही.

धोनीसाठी लवकर निरोपाचा सामना?विश्वचषक स्पर्धेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीकाकारांच्या चर्चेचा विषय ठरला. संथ खेळामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयमध्येही धोनीला निरोप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत्त येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच धोनीशी या संदर्भात चर्चा करणार आहेत.२०२०च्या टी२० विश्वचषकाच्या संघ निवडीत धोनीचा विचार होणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीकडून मिळत आहेत.‘ओवरथ्रो’वर सहा धावा बहाल करण्याची झाली चूक ‘विश्वचषक अंतिम सामन्यात पंचांनी इंग्लंडला ‘ओवरथ्रो’साठी पाचऐवजी सहा धावा बहाल करण्याचा चुकीचा निर्णय घेतला,’ असे माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेल व के. हरिहरन यांनी सोमवारी म्हटले. टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, आदिल राशिद व स्टोक्स यांनी ज्यावेळी दुसरी धाव पूर्ण केली नव्हती, त्यावेळी गुप्तीलने थ्रो केला होता, पण मैदानावरील अंपायर कुमार धर्मसेना व मारियास इरासमुस यांनी इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ