Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्... 

युजवेंद्र चहलनं केली कॅप्टन कोहलीकडे मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:14 IST

Open in App

लॉकडाऊनमुळे सर्व क्रिकेटपटूंना आपापल्या घरीच रहावं लागत आहे. मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे आणि त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) स्थगित करण्यात आली. खेळाडूंनाही आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याची संधी मिळाली. पण, मैदानावर परतण्यासाठी हे खेळाडू उत्सुक आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी ट्रेनिंगचा फोटो शेअर केला होता. लग्नानंतर विराटला प्रथमच पत्नी अनुष्का शर्मासोबत एवढा वेळ घालवता आला आहे. 

ही परिस्थिती कधी सुधरेल याची कोणालाच कल्पना नाही. पण, आत काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानं त्या भागात प्रवास सुरु झाला आहे. त्याचाच फायदा उचलत टीम इंडियाचा शिलेदार कर्णधार विराट कोहलीसाठी चक्क डोसा घेऊन त्याच्या घरी पोहोचला. विराटनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून याची माहिती दिली. भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरनं कॅप्टन कोहलीसाठी डोसा आणला. ( Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

अय्यर हा विराटच्या घरापासून 500 मीटरच्या अंतरावर राहतो. कोहलीनंही त्याला मशरूम बिर्यानी दिली.  युजवेंद्र चहलनं यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना कोहलीकडे डिमांड केली. त्यानं थोडीशी बिर्यानी त्याच्यासाठीही पाठवण्यास सांगितले. युवीचं घर येथून 1400 किलोमीटर दूर आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघयुजवेंद्र चहल